Margao Crime: खळबळजनक! घोगळ मशीद आवारात उपाध्यक्षाचा खून; चौघांच्या मुसक्या आवळल्या, हत्येला कमिटीच्या वादाची झालर

Margao Gogol Mosque Murder: अली कलंदर खानजादे (४०) असे मृताचे नाव असून, पोलिसांनी अक्रम खान व उबेद मकंदर या दोघांना तात्काळ ताब्यात घेतले.
Margao Gogol Mosque Murder
Margao Gogol Mosque MurderDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: घोगळ हाऊसिंग बोर्ड येथे सुन्नी गुलिस्तान मशिदीत शुक्रवारचा पवित्र नमाज अदा केल्यानंतर  मशिदीच्या आवारातच या मशीद समितीच्या उपाध्यक्षाचा चाकू भोसकून खून करण्याची  खळबळजनक घटना दुपारी  घडली. अली कलंदर खानजादे  (४०) असे मृताचे नाव असून, पोलिसांनी अक्रम खान व उबेद मकंदर या दोघांना तात्काळ ताब्यात घेतले.  तर सायंकाळी उशिरा आलम शाह व लतीफ सय्यद यांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी अक्रम हा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अली याच्यावर खुनी हल्ला झाल्यानंतर त्याला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा इस्पितळात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर, इस्पितळातच मृताच्या समर्थकांनी गर्दी करून आकांडतांडव करण्यास सुरुवात केली. वेळीच ज्यादा पोलिस कुमक बोलावून, पोलिसांनी जमावाला बाहेर काढले. स्थानिक आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी इस्पितळात जाऊन या जमावाला समजावून शांत केले. अनुचित प्रकार घडू  नये यासाठी पोलिस तैनात केले आहेत. 

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, संशयित अक्रम व त्याचे साथीदार नमाजसाठी पैसे आकारात होते. अली यांनी त्यास मनाई केल्याचा राग धरून अक्रमने त्यांचा खून केला.

दरम्यान , मयताच्या भावाने मशिदी कमिटीवर कुणाचा ताबा असावा यावरून वाद होत होता. त्यातून आपल्या भावाचा जीव गेला असल्याचे ते म्हणाले. आजच आम्ही अक्रमविरुद्ध फातोर्डा पोलिसांत तक्रार नोंदविली होती, असेही त्याने सांगितले.  

Margao Gogol Mosque Murder
Goa Crime: लोखंडी सळईने मारहाण, शिवीगाळ अन् धमकी; दोन सख्ख्या भावांवर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला, सांकवाळ हादरलं

अली हा होलसेल मासळी मार्केटात मासे विक्री करत होता. अक्रम हा पूर्वी बस कंडक्टर होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही  अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.फातोर्डा पोलिस निरीक्षक नेथॉन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

खून प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. या प्रकरणात अन्य गुंतले असतील तर सर्वांना अटक केली जाईल, असे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्माय़ांनी सांगितले. खुनाच्या या घटनेनंतर वर्मा यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक सिद्धांत शिरोडकर ,फातोर्डाचे पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा आदींनी संशयितांना अटक केली.

Margao Gogol Mosque Murder
Goa Crime: बायकोच्या निधनाचा धक्का असह्य, अवघ्या 24 तासांत नवऱ्यानही संपवलं जीवन; उत्तर प्रदेशच्या दाम्पत्याचा गोव्यात दुर्दैवी अंत

...तोवर मृतदेह घेणार नाही!

दरम्यान, अली यांच्या खून प्रकरणात एकूण पंधरा जणांचा समावेश असून, या सर्वांना अटक केल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका मयताच्या समर्थकांनी घेतली आहे. सर्वांना अटक करावी, अशी आमची एकमुखी मागणी आहे. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत तसेच प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडे आम्ही ही विनंती करीत आहोत. अपराध्यांना कठोर शासन व्हायला पाहिजे. आजच्या घटनेने आम्ही सर्व भयभीत आहोत, असेही या लोकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com