Mandrem Attack News Dainik Gomantak
गोवा

Mandrem News: मायकल लोबो वादाला हिंसक वळण; "तुकां मायकल जाय?" म्हणत मांद्रेच्या माजी सरपंचांवर जीवघेणा हल्ला

Mandrem Attack News: अचानक आलेल्या अज्ञातांनी "तुला मायकल पाहिजे का?" असा प्रश्न विचारून माजी सरपंच महेश कोनाडकर यांना मारहाण केली

Akshata Chhatre

Former Sarpanch of Mandrem Attack

मांद्रे: गोव्यातील काही अज्ञात लोकांकडून मांद्रे येथील माजी सरपंच्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. बुधवारी (दि. ४ डिसेंबर) रोजी घडलेल्या या घटनेमुळे मांद्रे परिसरात खळबळ उडाली आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मांद्रे मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा वाद वाढल्याने माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर पाच अज्ञात लोकांनी अचानक हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तवली जातेय. अचानक आलेल्या अज्ञातांनी "तुला मायकल पाहिजे का?" असा प्रश्न विचारून माजी सरपंचांना मारहाण केली. सध्या महेश कोनाडकर यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

आमदार मायकल लोबो यांनी काही दिवसांपूर्वी कळंगुटची लोकं सहकार्य करत असल्यास मांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे वक्तव्य केले होते आणि यामुळेच काहीसा वाद सुरु झाला होता. माजी सरपंच महेश कोनाडकर यांनी दरम्यान मायकल लोबो यांचे समर्थन केल्याने त्यांच्यावर हल्ला झाला असावा अशी शक्यता आहे.

महेश कोनाडकर यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार बुधवारी, सकाळी १० वाजताच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी त्यांना घेरलं आणि लोखंडी सळ्यांनी प्रचंड मारहाण केली. आल्याआल्या त्यांनी उद्वेगात "तुला मायकल लोबो हवाय का?" असा प्रश्न विचारात हल्ला चढवला. कानोडकर हल्यात जबर जखमी झाले आहेत, त्यांच्या शरीरावर वळ उठले असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्या मते अज्ञातांची भाषा बघता ती लोकं पेडण्यातून आली असल्याची शक्यता आहे, मात्र या अज्ञातांनी कोनाडकरांना का मारहाण केली असेल? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT