Mandrem News: अनाधिकृत शेडला गोवा खंडपीठाचा दणका! मांद्रे खाडीजवळ चालू होते बांधकाम

Mandrem Illegal Shed Construction: मांद्रे किनारी जलक्रीडा उपकरणांचा साठा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या लाकडी जेटी व काँक्रिट शेडच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी २४ रोजी होणार आहे.
Goa Bench
Goa BenchGomantak Digital Team
Published on
Updated on

पणजी: कोणताही परवाना नसताना व उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती आदेश देऊनही मांद्रे गावातील सर्वे क्र. २६३/१८ मधील मांद्रे किनारी जलक्रीडा उपकरणांचा साठा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या लाकडी जेटी व काँक्रिट शेडच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी २४ रोजी होणार आहे. गोवा फाऊंडेशनने या बांधकामाविरोधात जनहित याचिका सादर केली आहे.

या जनहित याचिकेत सरकारसह गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन, शहर व नगर नियोजन खाते, मांद्रे तलाठी, पेडणे उपजिल्हाधिकारी, वन संवर्धन विभाग, मांद्रे पंचायत, मांद्रे पोलिस निरीक्षक व साविओ डिसोझा यांना प्रतिवादी केले आहे. मांद्रे खाडीकिनारी साविओने लाकडी जेटी व शेडचे काम सुरू केले आहे. तलाठ्याच्या अहवालाआधारे पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी १६ रोजी हे बांधकाम बंद करण्याचा आदेश दिला होता.

Goa Bench
Verna Bus Accident : ..माणुसकी जिंकली! ‘त्या’ वारसांना मिळणार भरपाई; कामगार आयुक्तांनी राबवली बिहारमध्ये शोधमोहीम

बांधकाम हटवा!

ही खाडी कासव संवर्धन क्षेत्राजवळ आहे. या बांधकामामुळे कासव संवर्धनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे हे बांधकाम पाडण्याचा आदेश द्यावा. जनहित याचिकेवर सुनावणी होईपर्यंत त्याला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी विनंती याचिकेत केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court Minor Child
Goa High Court Double Murder Acquittal
Chimbel Illegal Borewells
mandar surlakar murder case goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com