Michael Lobo: आधी कळंगुटमधील गैरव्यवहार बंद करा; मांद्रेतून लढण्याचे संकेत देणाऱ्या लोबोंना सरपंचांनी सुनावलं

Mandrem Sarpanch Press Conference: कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची मांद्रे मतदार संघाला गरज नाही. त्यांनी अगोदर कळंगुट मतदार संघातील गैर व्यवहर बंद करावेत.
Goa Politics: लोबोंच्या विरोधात उभे ठाकले मांद्रेचे सरपंच! ''आधी कळंगुटमधील गैर व्यवहार बंद करा, नंतरच...''
Mandrem Sarpanch Press ConferenceDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची मांद्रे मतदार संघाला गरज नाही. त्यांनी अगोदर कळंगुट मतदार संघातील गैर व्यवहर बंद करावेत, नंतरच मांद्रेतून निवडणूक लढविण्याचा विचार करावा, अशी भूमिका मांद्रे मतदारसंघातील सरपंचांनी पत्रकार परिषदेत घेतली.

यावेळी आगरवाडा सरपंच सचिन राऊत, मांद्रे सरपंच मिगेल फर्नांडिस, हरमल सरपंच सांतान फर्नांडिस, केरी सरपंच धरती नागोजी, पार्से उपसरपंच अजित मोरजकर, पालये पंचायत सदस्य सागर तिळवे, रॉबर्ट फर्नांडिस, अजय गाड उपस्थित होते.

Goa Politics: लोबोंच्या विरोधात उभे ठाकले मांद्रेचे सरपंच! ''आधी कळंगुटमधील गैर व्यवहार बंद करा, नंतरच...''
Goa Politics: 'कळंगुट'सोडून मायकल मांद्रेतून लढणार? 2027 च्या निवडणुकीबाबत लोबोंचे मोठं भाष्य

मायकल लोबो यांनी हल्लीच आपण मांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आज मांद्रे मतदार संघात उमटले. मांद्रे मतदारसंघातील सरपंचांनी खास पत्रकार परिषद घेऊन लोबो याचा समाचार घेतला.

लोबो यांनी अगोदर आपल्या मतदार संघातील सर्व बेकायदेशीर धंदे बंद करावेत आणि नंतरच पुढे बोलावे, असा टोमणाही पंचायत सदस्य सागर तिळवे यांनी लावला. मतदार संघातील जनतेने निवडून दिलेला युवा नेतृत्व आणि संस्कृती जपणारा नेता जीत हे सक्षम आहेत, असे त्यांनी सांगितले.

Goa Politics: लोबोंच्या विरोधात उभे ठाकले मांद्रेचे सरपंच! ''आधी कळंगुटमधील गैर व्यवहार बंद करा, नंतरच...''
Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

मतदारांना विश्वासात घेऊनच निर्णय

मी केलेल्या विधानाचा उगाच कुणी बाऊ करु नये. विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन वर्षाचा काळ आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत कळंगुट मतदार संघातील माझ्या मतदारांना विश्वासात घेतल्याशिवाय अथवा त्यांच्यासोबत चर्चा केल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही, असे आमदार मायकल लोबो यांनी स्पष्ट केले.

गाऱ्हाणे घातले त्याचे काय झाले

काँग्रेसचे उमेदवार असताना लोबो यांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांसोबत देव बोडगेश्वर, देव महालक्ष्मी, बांबोळी क्रॉस अशा वेगवेगळ्या देव देवतांकडे गाऱ्हाणे घातले होते. पक्षाशी निष्ठावंत राहणार, असेही वचन त्यांनी दिले होते. मात्र त्याचे काय झाले, असा सवाल सागर तिळवे यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com