dashavtari Artist Suryakant Rane Dainik Gomantak
गोवा

Dashavatar Artist : दशावतारासाठी वेचले आयुष्य

नाट्यउपासक सूर्यकांत राणे : पदरमोड करून सादर केली नाटके

दैनिक गोमन्तक डिजिटल

महाराष्ट्रात खासकरून कोकणात सिंधुदुर्गमध्ये आजही अनेक युवक दशावतारी कला सादर करताना दिसतात. गोव्यातही कलाकार आहेत; परंतु हातावर मोजण्याइतकेच. सत्तरी तालुक्यातील भिरोंडा गावचे सूर्यकांत राणे हे त्यापैकी एक. त्यांनी संपूर्ण आयुष्य दशावतारी कलेसाठी वाहिले.

राणे हे अष्टपैलू नाट्यकलाकार. केवळ नाटकात काम करायला मिळावे, यासाठी त्यांनी आठवीतूनच शाळा सोडली. मामा मोचेमाडकर कंपनीत त्यांनी वीस वर्षे काम केले. इतर दशावतारी कंपन्यांमध्ये त्यांनी कला साकारली.

विशेष म्हणजे, त्यांनी साकारलेल्या स्त्री भूमिका आजही अजरामर आहेत. अनेक नाटकांत त्यांनी एकाचवेळी दोन भूमिका साकारल्या. वीरचक्र, श्‍यामसुंदर, इंद्रजीत व इतर काही नाटके त्यांनी लिहिली. पदरमोड करून ती हौशी कलाकारांकरवी सादर करवून घेतली. ते उत्कृष्ट मूर्तीकारही आहेत.

आडेलीचे बाबा पालव, ओठवणेचे गंगाराम मेस्त्री, रेडीचे बाली मास्‍तर हे नाट्यतपस्वी माझे गुरू असल्याचे ते सांगतात. नाट्यप्रयोगासाठी चालत प्रवास करायचे. जागरण, उपवास, प्रसंगी हातात कोयता घेऊन वाटेतील काटेकुटे बाजूला सारत ते गावोगावी नाटक सादर करण्यासाठी जायचे. महिनोन महिने घराबाहेर राहायचे.

कठीण प्रसंगातही कलानिष्ठा अभंग

प्रसुतीच्यावेळी त्यांच्या पत्नीच्या जीवावर बेतलेले असतानाही त्यांची नाट्यनिष्ठा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर कलेची देवता विघ्नहर्त्या गजाननाला प्रार्थना करून चौकुळ गावातील नाटकात भूमिका साकारण्यासाठी ते निघाले. दशावतारी कला जोपासली, ती केवळ कुटुंबीयांच्या सहयोगामुळेच, असे ते आवर्जून सांगतात.

सरकारचे मानधन तोकडे

राणे म्हणाले की, गोवा सरकारच्या ‘रंग सन्मान’ योजनेतून कलाकारांना दिले जाणारे ३,२०० रुपयांचे मानधन पुरेसे नाही. कारण दशावतारी कलाकारांचा पगारच तुटपुंजा असतो. पण जेव्हा शरीर थकते, तेव्हा कमवण्याचे साधन नाहीसे होते. तेव्हा मदतीला येते ते रंग सन्मान योजनेतील मानधन.

परंतु ते पुरेसे नाही. कारण म्हातारपणी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यावेळी पैशांची कमतरता भासते. या योजनेचा लाभ कलाकाराच्या पश्‍चात त्यांच्या कुटुंबीयांनाही मिळायला हवा

प्रतिनिधी - गंगाराम आवणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT