कासवसंवर्धन परिसरातही ध्वनिप्रदूषण!

निसर्गचक्रावरच घाला : वनमंत्र्यांच्‍या आदेशानंतर पोलिसांची धावपळ; मात्र एकही गुन्हा नाही
Turtle
Turtle
Published on
Updated on

कासवसंवर्धन परिसरात सूर्यास्तनंतर सुरू होणाऱ्या संगीत रजनी पार्ट्या ध्वनिप्रदूषण करत आहेत. विशेष म्‍हणजे या पार्ट्या सूर्योदयापर्यंत सुरू असतात. याची गंभीर दखल वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी घेऊन असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि वन खात्यातर्फे योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे

त्यानुसार पेडणे पोलिस पुन्‍हा एकदा जागे झाले, मात्र अजून एकही गुन्हा नोंद केलेला नाही. मोरजी, आश्‍‍वे-मांद्रे हे किनारे कासवसंवर्धन मोहिमेमुळे संवेदनशील म्हणून सरकारने घोषित केलेले आहेत. परंतु याच किनारी भागात सूर्यास्तानंतर मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या पार्ट्या सुरू असतात.

Turtle
Mapusa: अल्पवयीन मुलगी घरात आंघोळ करत होती, कुटुंबीय घराबाहेर असताना त्याने संधी साधली

त्‍यामुळे स्थानिकांनाही त्रास होतो. शिवाय आजारी लोकांनाही मन:स्‍ताप सहन करावा लागतो. सरकारकडून एका बाजूने अशा पार्ट्यांची गय केली जाणार नाही असे सांगितले जाते तर दुसऱ्या बाजूने पोलिसांवर दबाव टाकून त्या बंद न करण्याचे अलिखित आदेश दिले जातात. त्‍यामुळे पोलिसही पार्ट्यांवर कारवाई करण्‍यास धजावत नाहीत.

रात्रीच्‍या कर्णकर्कश आवाजामुळे समुद्री कासव किनाऱ्यावर अंडी घालण्‍यास येत नाहीत. त्‍यामुळे आरक्षित जागा असूनही त्‍याचा काहीच उपयोग होत नाही. अन्‍य दुसऱ्या किनाऱ्यांवर अंडी घालण्‍यास जाण्‍याची तर सोयच नाही. कारण तेथेही धूमधडाका सुरूच असतो.

परिणामी निसर्गचक्राला मानवाकडून आव्‍हान दिले जातेय. दरम्‍यान, या प्रचंड ध्‍वनिप्रदूषणातही यंदा 35 सागरी कासवांनी 2900 पेक्षा जास्त अंडी घातल. त्यास तेंबवाडा मोरजी येथे सुरक्षित जागा देण्‍यात आली.

Turtle
Goa Water Problem: मोतीडोंगर भागात पाणी विभागाचा गलथानपणा

आश्‍‍वेतील ‘त्‍या’ क्‍लबवर कारवाई का नाही?

काही दिवसांपूर्वी ‘मार्बेला’ बीच रिसॉर्टवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी वाहव्‍वा मिळविली होती. परंतु त्यानंतर एकाही पार्टीविरोधी गुन्हा नोंद झाला नाही. विशेष म्‍हणजे ज्या रेस्टॉरंट, क्लबमध्ये अशा संगीत रजनी आयोजित केल्या जातात, त्यांना कोणी परवाने दिले याचीही माहिती पोलिसांना नसते. त्यामुळे कारवाई कोण आणि कुणावर करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आश्वे येथील एका क्लबमध्ये रात्री दहानंतर ज्या पार्ट्या सुरू होतात, त्या पहाटेपर्यंत चालतात. कारण मालक बिगरगोमंतकीय व्यावसायिक असल्यामुळे त्याचे लागेबांधे दिल्लीपर्यंत पोचलेले आहेत. तेथून तो सूत्रे फिरवतो की काय, अशी शंका आता निर्माण झाली आहे. शुक्रवार, शनिवार व रविवार हे तीन दिवस तर तेथे गोंगाट सुरू असतो.

"लोकांच्या वाढत्या तक्रारींमुळे पोलिसांनी रात्री दहा-साडेदहानंतर आश्‍‍वे येथे जाऊन पार्टी बंद घालण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या क्लबवर पोलिसांनी आजपर्यंत कोणताच गुन्हा नोंदविला नाही. रात्री दहानंतर संगीत वाजवलं तर कायद्याने गुन्हा नोंदविण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. परंतु तसे का होत नाही? पोलिस कारवाई करण्‍यास का धजावत नाहीत?"

- ॲड. प्रसाद शहापूरकर,

ध्वनिप्रदूषण समितीचे सदस्य

"आमच्‍याकडे तक्रार आल्‍यानंतर आम्‍ही घटनास्थळी जाऊन ती पार्टी बंद पाडली. तसेच आयोजकांना सक्त ताकीदही दिली होती. विशेष म्‍हणजे खुद्द आपण त्‍या ठिकाणी हजर होतो. रात्री दहानंतर संगीत वाजविले तर कोणत्‍याही परिस्‍थितीत गय केली जाणार नाही, असा सज्जड इशाराच आयोजकांना देऊन आम्‍ही तेथून माघारी फिरलो."

- दत्ताराम राऊत, पोलिस निरीक्षक, पेडणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com