Dabolim Health Issue Dainik Gomantak
गोवा

Dabolim: प्रक्रिया न केलेले पाणी मिसळल्यानेच अतिसार! दाबोळीतील स्थिती नियंत्रणाखाली; संकुलाची पाणी जोडणी खंडित करण्याचे आदेश

Dabolim Health Issue: दाबोळी येथील ३२८ सदनिका असलेल्या प्रभू व्हायलोटा निवासी संकुलातील अतिसार, उलट्या व ताप येणे ही परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: दाबोळी येथील ३२८ सदनिका असलेल्या प्रभू व्हायलोटा निवासी संकुलातील अतिसार, उलट्या व ताप येणे ही परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. आरोग्य खाते, प्रदूषण नियंत्रण महामंडळ व पेयजल खात्यामार्फत सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एगना क्लिटस यांनी मडगावात पत्रकारांना दिली.

या निवासी संकुलातील १५६ लोकांना अतिसार, उलट्या व ताप येण्याची लागण लागली असली तरी सर्वांवर योग्य उपचार करण्यात आले आहेत. बुधवार, १८ मार्च रोजी केवळ दोन प्रकरणे उघडकीस आली, तर गुरुवारी एकही प्रकरण नोंदवले गेले नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

या निवासी संकुलात पिण्याचे पाणी व मिनरल पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश पीडबल्यूडीला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या संकुलातील पाणी पुरवठ्याची जोडणी त्वरित खंडित करण्याचे आदेश तालुक्यातील मामलतदारांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी एगना क्लिटस यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ रमेश गावकर यांच्या उपस्थितीत सर्व संबंधितांची याप्रकरणी आढावा बैठक घेतली. यावेळी मुरगाव तालुक्यातील उप जिल्हाधिकारी, एसडीएम, मामलतदार, जिल्हा इस्पितळ, कुठ्ठाळी आरोग्य केंद्राचे अधिकारी, वास्को पोलिस निरीक्षक व चिखली पंचायतीचे सचिव उपस्थित होते. या विषयावर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नादुरुस्त

या संकुलातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नादुरुस्त असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे प्रक्रिया न केलेले व प्रक्रिया केलेले पाणी मिश्रित झाल्याने लोकांचे आरोग्य बिघडले. सर्व संबंधित खात्यांना यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे, अशी माहिती एगना क्लिटस यांनी दिली.

पॉझिटिव्ह पाणी नमुने

संकुलातील पिण्याचे पाणी, स्विमिंग पूलमधील पाणी, पाण्याच्या टाक्या, गार्डन व बोअरवेल यातील पाण्याची तपासणी केली जात आहे. गार्डनमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व बोअरवेलमधील पाण्याचे नमुने पोझिटीव्ह सापडले, तर इतर नमुने निगेटिव्ह असल्याची माहिती एगना क्लिटस यांनी दिली. लोकांनी दक्ष राहावे व आरोग्य बिघडल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्राकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सरकारवर टीका

दाबोळी येथील निवासी संकुलातील नागरिकांना लागलेली अतिसार ही मूलभूत प्रशासनाचे अपयश आहे, अशी टीका द कॅथॉलिक असोसिएशन ऑफ गोवा चे सिरील ए फर्नांडिस यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

गोमंतकीय दूषित पाणी व घोर निष्काळजीपणापेक्षा चांगल्या वागणुकीस पात्र आहेत, असे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले. आणखी किती लोकांना ही लागण लागल्यावर सरकार जागृत होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT