Goa News: गोवा मंत्रिमंडळाकडून 'जीआयएम विद्यापीठ विधेयक 2026' मंजूर; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: मराठीमध्ये जाणून घ्या गोव्यातील राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महतवाच्या ठळक बातम्या
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

मोपा विमानतळावरील वेळेच्या निर्बंधांविरुद्ध टॅक्सी चालक आक्रमक

पणजीतील आल्तिनो येथील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर आज तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील शेकडो टॅक्सी चालक मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी तिथे पोहोचल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर तगडा बंदोबस्त; कारण काय?

सध्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले असून, पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत. कोणत्याही आंदोलनाला निवासस्थानापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

पर्वरी सर्व्हिस रोडचे 2-3 दिवसांत 'हॉट-मिक्सिंग'; मंत्री दिगंबर कामत यांचे आश्वासन

पर्वरी येथील सहा पदरी उड्डाणपुलाच्या कामामुळे खराब झालेल्या सर्व्हिस रोडची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी घोषणा केली आहे की, पर्वरी येथील सर्व्हिस रोडचे हॉट-मिक्सिंग येत्या २ ते ३ दिवसांत पूर्ण केले जाईल.

"लोकांना जे हवे तेच आम्ही करू"; Section 39A बाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे महत्त्वाचे विधान

नगरनियोजन कायद्याच्या (TCP Act) वादग्रस्त कलम ३९ अ (Section 39A) विरोधात गोव्यात जनक्षोभ वाढत असताना, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज यावर आपली भूमिका मांडली. 'जस्टिस रिबेलो सार्वजनिक सभेत' करण्यात आलेल्या मागण्या आणि वाढता विरोध लक्षात घेता, सरकार लोकांच्या इच्छेचा मान राखेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

मंत्रिमंडळाकडून 'जीआयएम विद्यापीठ विधेयक 2026' मंजूर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा मंत्रिमंडळाने आज साखळी येथील प्रसिद्ध गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (GIM) या संस्थेला 'खाजगी विद्यापीठ' (Private University) म्हणून अधिकृत दर्जा देणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. 'जीआयएम विद्यापीठ विधेयक २०२६' आता आगामी विधानसभा अधिवेशनात मंजुरीसाठी मांडले जाणार आहे.

गोवा मंत्रिमंडळाकडून व्हॅल्यू ॲडेड टॅक्स (VAT) सुधारणा विधेयक मंजुर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 'गोवा मूल्यवर्धित कर (दुरुस्ती) विधेयक २०२६' (Goa Value Added Tax Bill, 2026) आणण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक येत्या १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात मांडले जाणार आहे.

रेडेघाट–सत्तरी येथे रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिग

रेडेघाट–सत्तरी परिसरात अनेकजण बिनधास्तपणे रस्त्याच्या कडेला कचरा फेकत असल्याने हा भाग सध्या कचरा टाकण्याचे ठिकाण बनला आहे. रस्त्याच्या बाजूला साचलेल्या कचऱ्यामुळे येथील नदीदेखील प्रदूषित झाली आहे.

तुये हॉस्पिटल 100% 'जीएमसी'शी जोडले जाणार

पेडणे तालुक्यातील तुये येथील नवीन शंभर खाटांचे हॉस्पिटल आता पूर्णपणे गोवा मेडिकल कॉलेज (GMC) च्या व्यवस्थापनाखाली चालवले जाणार आहे. आमदार जीत आरोलकर यांनी या निर्णयाची पुष्टी केली असून, यामुळे स्थानिकांना आता सुपर-स्पेशालिटी उपचारांसाठी बांबोळीला जाण्याची गरज भासणार नाही.

धारगळ दोन खांब ते आरोबा हॉट मिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ

धारगळ दोन खांब ते आरोबा पर्यंत रस्त्याचे हॉट मिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते.

दक्षिण गोव्यात भाडेकरू आणि पर्यटकांची पोलीस पडताळणी अनिवार्य

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांनी सार्वजनिक सुरक्षा आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात भाडेकरू पडताळणी अनिवार्य करण्याचा आदेश जारी केला आहे. गुन्हेगार बनावट नावांनी राहून गुन्हे करत असल्याचे समोर आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अजय गुप्ताच्या जामिनावर 20 जानेवारीला सुनावणी

हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) क्लबला लागलेल्या आगीप्रकरणी कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा न्यायालयाने या प्रकरणातील संशयित आरोपींच्या जामीन अर्जांबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com