Chairman Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition: आमदार अपात्रता! सभापती रमेश तवडकरांच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान

Goa MLA Disqualification Petition: गिरीश चोडणकर यांनी सभापतींकडे या आठ आमदारांना अपात्र करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa MLA Disqualification Petition

पणजी: काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांच्या अपात्रता याचिकेप्रकरणी सभापती रमेश तवडवकर यांनी दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. ही याचिका आज (06 जानेवारी) खंडपीठासमोर आली असता त्यावरील सुनावणी येत्या १५ जानेवारीला ठेवण्यात आली.

सभापतींच्या आदेशाविरोधात घटनेच्या कलम १३६ अंतर्गत याचिका दाखल झाली आहे. कलम १३६ नुसार सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी सुनावणी करू शकत नाही, असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी चोडणकर यांच्या विशेष याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी स्पष्ट केले होते.

त्यांनी चोडणकरांना कलम २२६ नुसार उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे गिरीश चोडणकर यांनी ही याचिका मागे घेतली होती.

गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये होताच त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसच्या दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस, मायकल लोबो, केदार नाईक, दिलायला लोबो, राजेश फळदेसाई या आठ आमदारांनी वेगळा गट स्थापन करून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

गिरीश चोडणकर यांनी सभापतींकडे या आठ आमदारांना अपात्र करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. सभापती रमेश तवडकर यांनी त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर चोडणकरांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती.

अवमान याचिका !

आमदार अपात्रतेबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर वेळेत निर्णय न दिल्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सभापती रमेश तवडकर यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT