Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: सरकार दाबोळी विमानतळाचा गळा आवळतेय!

Dabolim Airport: विजय सरदेसाई : तीन वर्षांत विकास शुल्‍कात 540 टक्‍क्‍यांनी होणार वाढ

दैनिक गोमन्तक

Dabolim Airport In Goa:

दाबोळी विमानतळ भविष्‍यात स्‍वत:चे मरण मरणार असे जरी भासविले जात असले, तरी प्रत्‍यक्षात सरकारकडून दाबोळी विमानतळाचा गळा आवळण्‍याचे हेतूपुरस्‍सररित्‍या प्रयत्‍न केले जात आहेत, असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला.

येत्‍या तीन वर्षांत या विमानतळावरील वापरकर्ता विकास शुल्‍कात 540 टक्‍क्‍यांनी वाढ होणार असून एवढी प्रचंड वाढ झाल्‍यास या विमानतळावर कुठलीही विमान कंपनी आपले विमान उतरविणार नाही, असा इशारा त्‍यांनी दिला आहे.

कतार एअरवेज या विमान कंपनीने २० जून २०२४ पासून दाबोळी विमान तळावरून सर्व उड्डाणे रद्द करण्याचे काल घोषित केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना विजय सरदेसाई म्हणाले की, गोवा विधानसभेत आपण हा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपण लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी त्यांचे आश्वासन पाळले नाही.

२०२७-२८ पर्यंत दाबोळी विमानतळावरील वापरकर्ता विकास शुल्क १७९१ रुपये प्रतिप्रवासी होणार असून सध्‍याच्‍या शुल्‍काच्‍या तुलनेत ही वाढ ५४० टक्‍क्‍यांनी जास्‍त असेल. याउलट मोपा विमानतळावर हे शुल्‍क प्रतिप्रवासी फक्‍त ८४० रुपये एवढे असेल. दोन्‍ही विमानतळावरील शुल्‍कात एवढ्या मोठ्या प्रमाणावर तफावत असेल, तर विमान कंपन्‍या दाबोळीवर आपली विमाने का म्‍हणून उतरवतील असा सवाल सरदेसाई यांनी केला.

दोन्‍ही विमानतळावरील वापरकर्ता विकास शुल्क समान असावे अशी मागणी आपण मुख्‍यमंत्र्यांकडे केली होती. नागरी उड्डाण मंत्रालयाकडे चर्चा करून हे शुल्‍क समान ठेवण्‍याचे प्रयत्‍न केले जातील, असे आश्वासन मुख्‍यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, त्‍यावर मुख्यमंत्र्यांनी काहीच केले नाही, असा आरोप सरदेसाई यांनी केला.

दाबोळी विमानतळ बंद करू देणार नाही : चोडणकर

भाजपने आपला खरा रंग दाखवायला सुरवात केली आहे. दाबोळी विमानतळ बंद करण्याचे त्यांनी कटकारस्थान रचल्याचा आरोप काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला आहे. कतार एअरवेजने आपली दाबोळी विमानतळावरील सेवा बंद करून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतर केली आहे,

हा प्रक्रार म्हणजे दक्षिण गोवा विमानतळाचा ‘द एंड’ करण्याचा भाजपचा डाव आहे. यामुळे दक्षिण गोव्याची अर्थव्यवस्था नष्ट होईल. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही हा विषय उपस्थित करत होतो. आज आमच्या शंका प्रत्यक्षात येत आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या उत्पन्नाचे साधन असलेले हे विमानतळ टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: अंत्यविधीच्या ठिकाणी 'ऑर्केस्ट्रा'! एका बाजूला चिता जळतेय, दुसऱ्या बाजूला गाण्यांवर डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Ind A vs SA A: सलामीवीर ढेपाळले, मधल्या फळीनेही हात टेकले, आफ्रिकेने टीम इंडियाला 73 धावांनी चारली पराभवाची धूळ; क्लीन स्वीपचे स्वप्न भंगले! VIDEO

Konkan Railway: कोकण रेल्वेतील मोठी कारवाई! नागरकोइल-गांधीधाम एक्सप्रेसमध्ये दारुच्या बाटल्यांनी भरलेल्या बेवारस बॅगा जप्त; 'टीसी'च्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

Goa Tourism: आखाती देशांतील पर्यटक आकर्षित करण्यासाठी गोवा सज्ज! थेट बहरीनमध्ये आयोजित केलाय रोड शो

World Cup 2026: क्रिकेट वर्ल्ड कप शेड्यूल जाहीर, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; चाहत्यांची वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT