Goa congress Dainik Gomanatk
गोवा

Goa Congress: गोव्यातील कलाकारांना वंचित ठेवणे हाच का सरकारचा ‘स्वयंपूर्ण गोवा’

Goa Congress: काँग्रेस नेते दिव्या कुमार: मंत्री गोविंद गावडे यांनी उत्तर द्यावे

दैनिक गोमन्तक

Goa Congress: गोव्यातील प्रतिभावान कलाकारांना बाजूला ठेवून श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे संगीतमय कार्यक्रम भाजप सरकारने गोव्याबाहेरील कलाकारांना दिले आहे. हाच का मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ‘स्वयंपूर्ण गोवा’? गोव्यातील कलाकारांना संधी कधी मिळणार? कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे समाज माध्यम प्रमुख दिव्या कुमार यांनी केली आहे.

श्रीराम मंदिर उद्‍घाटनानिमित्त आयोजित तीन दिवसीय उत्सवाचा भाग म्हणून काल रवींद्र भवन, मडगाव येथे आयोजित संगीत मैफलीत गोव्याबाहेरील कलाकारांच्या कार्यक्रमावर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. या कलाकारांची मैफल रवींद्र भवन, वास्को आणि गोव्यातील इतर काही ठिकाणी होणार आहे.

गोव्यातील गायक आणि संगीतकारांना कार्यक्रमाची संधी का दिली गेली नाही? भाजप गोव्यातील कलाकारांसोबत ‘कमिशन डील’ करू शकत नाही म्हणून का? असा सवालही दिव्या कुमार यांनी केला.

सरकारी खर्चातूनच महाप्रसाद

मडगावच्या रवींद्र भवनातील तीन दिवसीय कार्यक्रमाचा अंदाजे खर्च १.२५ कोटी होता. मडगाव आणि फातोर्डा येथील विविध मंदिरात मडगावचे आमदार व फातोर्ड्याचे माजी आमदार यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या महाप्रसादाचा खर्च सदर खर्चातूनच भागविण्याचा त्या दोघांचा डाव होता. सरकारी पैशाने आपली पोळी भाजून घेण्याचा मडगावचे आमदार व फातोर्ड्याचे माजी आमदार प्रयत्न करीत होते, असा गौप्यस्फोट दिव्या कुमार यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT