Goa Road Issue: रेल्वे प्रशासनाविरुद्ध पुन्हा वेळसांववासीयांची निदर्शने

Goa Road Issue: रेल्वे कंत्राटदाराने रस्ता खोदला: ग्रामस्थ आक्रमक; गावात तणाव कायम
Goa Road Issue
Goa Road IssueDainik Gomantak

Goa Road Issue: कोणतीही कल्पना न देता लोकांची वहिवाट असलेल्या रस्त्याचे रेल्वेच्या कंत्राटदाराने खोदकाम केल्याने वेळसांवासीयांनी आज आक्रमक होत जोरदार निदर्शने केली. त्यामुळे आज पुन्हा वेळसांव गावात तणाव निर्माण झाला.

Goa Road Issue
Ayodhya Ram Mandir: अविरत संघर्षाअंती अखेर आज आनंदाचे क्षण!

आम्हाला कोळसा, रेलमार्ग दुपदरीकरण नको असून हा रस्ता त्वरित पूर्ववत करावा. त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. वेळप्रसंगी गोव्यातील इतर संघटनांना बरोबर घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी वेळसांववासीयांनी दिला. याप्रकरणी संबंधित सरकारी यंत्रणांकडे तक्रारी करण्यात आल्याचे ‘गोंयचो एकवोट’चे ओर्विल दोरादो यांनी सांगितले.

वेळसांव येथील रहिवाशांचा रेलमार्ग दुपदरीकरणाला व रेल्वेने होणाऱ्या कोळसा वाहतुकीला विरोध आहे. यापूर्वीही तेथील रहिवाशांनी आंदोलने केली होती. गेल्या काही महिन्यांपासून हे आंदोलन थंडावले होते. परंतु रेल्वेच्या कंत्राटदाराने प्रिमोरोवाडो - वेळसांव येथील रस्त्याचे खोदकाम केल्याने तेथील रहिवासी आक्रमक झाले आहेत. या खोदकामामुळे रस्त्यावरून वाहने हाकणे कठीण झाले आहे.

Goa Road Issue
Goa Crime News: गौरवच्या अंगावर नखांचे ओरखडे नेमके कोणाचे

याप्रकरणी तेथील रहिवाशांनी आज एकत्र येऊन आंदोलन केले. या रस्त्यावर रेल्वेचा कोणताही अधिकार नसताना तसेच या जागेचे सर्व दस्तऐवज आमच्याकडे असतानाही रेल्वेच्या कंत्राटदाराने तेथील रस्ता खोदला आहे. यापूर्वीही रेल्वेने तेथील पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी वाट बंद केली होती. कोळसा वाहतुकीमुळे सगळीकडे कोळसा भुकटी नजरेस पडत असल्याचा दावा तेथील रहिवाशांनी केला आहे.

‘भविष्यात उत्तरेतही कोळसा प्रदूषण’

आज दक्षिण गोव्यात कोळसा प्रदूषण होत असल्याने उत्तर गोव्याचे लोक गप्प आहेत. मात्र, येणाऱ्या काळात उत्तर गोव्यातही कोळसा प्रदूषण होईल याचे भान ठेवले पाहिजे. मानवी जीवन, पर्यावरण, घरे आदींचे रक्षण करा, असे आवाहन माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांनी केले.

‘कोळसा कर्नाटकातील बंदरात उतरवा’

लोकप्रतिनिधींनी या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करण्याची गरज आहे. तेथील घरांच्या भित्तींना तडे गेले आहेत. मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक करण्यासाठी रेलमार्ग दुपदरीकरण करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियातून मुरगाव बंदरात येणारा कोळसा कोठे जातो, असा सवाल माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांनी उपस्थित केला. हा कोळसा कर्नाटकातील कंपन्यांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे तो तेथील बंदरात उतरविण्यात आला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com