Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: "आता सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच चौकशी व्हावी!" राम मंदिरातील कथित देणगी घोटाळाप्रकरणी काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांची मोठी मागणी

Ram Temple Donations: अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी देशभरातील नागरिकांनी कष्टाच्या कमाईतून देणग्या दिल्या.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी देशभरातील नागरिकांनी कष्टाच्या कमाईतून देणग्या दिल्या. मात्र, त्या देणग्यांमधील आर्थिक गैरव्यवहाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या हिमाचल प्रदेश व चंदीगडच्या प्रभारी तथा माजी खासदार रजनी पाटील यांनी रविवारी केली.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार ॲड. कार्लोस फेरेरा, माध्यम व जनसंपर्क विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक उपस्थित होते.

भाजपने राम मंदिराच्या मुद्द्याचा राजकीय लाभ उठवला, हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे देणग्यांमधील कथित आर्थिक अनियमिततेची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली न्यायालयीन चौकशी व्हावी आणि या विषयावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT