Yatish Naik Dainik Gomantak
गोवा

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

Yatish Naik SIR Statement: भारतीय घटनेच्या अखत्यारित राहत निवडणूक आयोग स्वतंत्रपणे मतदान प्रक्रिया राबवत असतो.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: भारतीय घटनेच्या अखत्यारित राहत निवडणूक आयोग स्वतंत्रपणे मतदान प्रक्रिया राबवत असतो. त्यात काही चुका असतील तर त्या योग्य व्यासपीठावर मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे; परंतु कॉंग्रेस आणि विरोधातील काही पक्ष वारंवार संविधानिक संस्थावर हल्ला करत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते यतीश नाईक यांनी केले.

ते भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सिद्धेश नाईक आणि सर्वानंद भगत उपस्थित होते. यतीश नाईक म्हणाले की, पात्र मतदारांची नोंदणी व अपात्र मतदारांची नावे वगळण्यासाठी निवडणूक आयोग ‘एसआयआर’ प्रक्रिया राबवतो. काँग्रेसच्या कार्यकाळातही ही प्रक्रिया राबविण्यात आली होती.

आयोगाने केंद्रापासून बूथस्तरापर्यंत अधिकारी तसेच प्रत्येक पक्षाचे ‘बीएलए’ नियुक्त केले आहेत. ‘एसआयआर’ प्रक्रियेबाबत आक्षेप असल्यास न्यायालयात दाद मागता येते. भाजप विरोधात असतानाही त्याने या प्रक्रियेवर कधी आक्षेप घेतला नव्हता. काँग्रेसकडे ठोस मुद्दे नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे.

काँग्रेसची दुहेरी भूमिका

काँग्रेसची केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश येथे सरकारे आहेत. तेथेही ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविण्यात आली. तेथे त्यांचे सरकार आले म्हणजे समस्या नाही, अशी दुहेरी भूमिका घेतली जात आहे. देशात संविधानिक संस्थांबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया पसरविण्यासाठी प्रयत्न केला जातोय. आम्ही या प्रकाराबाबत कॉंग्रेसचा निषेध करत असल्याचे सिद्धेश नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

SCROLL FOR NEXT