नरकासुर पाहण्यास गेलेली बेपत्ता तरुणी सापडली; अपहरण नव्हे, मित्रासोबत गेल्याचे तरुणीकडून स्पष्ट

Saligao missing girl latest news: साळगाव येथे नरकासुराच्या प्रतिमा पाहण्यासाठी मैत्रिणीसोबत गेलेली आणि त्यानंतर बेपत्ता झालेली १९ वर्षीय तरुणी अखेर सुखरूप सापडली आहे.
Saligao missing girl latest news
Saligao missing girl latest newsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: साळगाव येथे नरकासुराच्या प्रतिमा पाहण्यासाठी मैत्रिणीसोबत गेलेली आणि त्यानंतर बेपत्ता झालेली १९ वर्षीय तरुणी अखेर सुखरूप सापडली आहे. मंगळवारी संध्याकाळी पणजी बसस्थानकावर हणजूण पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आपले कोणत्याही अज्ञात व्यक्तीने अपहरण केले नसून, आपण स्वतःच्या मर्जीने एका पुरुष मित्रासोबत गेल्याचे या तरुणीने स्पष्ट केले आहे.

नागवा-हणजूण येथील एका ४९ वर्षीय चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची १९ वर्षांची मुलगी ७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास साळगाव येथे नरकासुर पाहण्यासाठी घराबाहेर पडली होती.

मात्र, त्यानंतर ती घरी न परतल्याने वडिलांनी अज्ञाताने तिला बळजबरीने किंवा फसवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला होता. या तक्रारीच्या आधारे हणजूण पोलिस ठाण्यात ९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १३८ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा नोंदवून उपनिरीक्षक साईश किनळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला होता.

Saligao missing girl latest news
Goa Congress RGP Alliance: जागावाटपाबाबत काँग्रेसकडून उशीर, 'आरजी'च्या बारा मतदारसंघांतील प्रमुखांसोबत बुधवारी बैठक

पणजी बसस्थानकावरून ताब्यात

पोलिसांनी शोधमोहीम राबवून अवघ्या २४ तासांत तरुणीचा माग काढत तिला पणजी बसस्थानकावरून ताब्यात घेतले. चौकशीनंतर तिला हणजूण पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून तिच्यासोबत गेलेल्या संबंधित मित्राचाही पोलिस सध्या शोध घेत आहेत.

Saligao missing girl latest news
Goa Ujjwala Scheme: मंत्र्यांचा दणका बसताच अधिकाऱ्यांची धावपळ; 'गोवा उज्ज्वला'च्या अर्जांची चार तालुक्यांत छाननी पूर्ण, बुधवारपासून लाभार्थ्यांना मिळणार पैसे!

मानवी तस्करीखाली गुन्ह्याचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘जी. गणेश विरुद्ध तामिळनाडू राज्य’ (मे २०२६) या निकालानुसार, बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीवर तातडीने अपहरण अथवा मानवी तस्करीच्या कलमांखाली थेट गुन्हा दाखल करण्याचे सक्त निर्देश आहेत.

पोलिस मुख्यालयाच्या आदेशानुसार पोलिस या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करत असून सर्व बेपत्ता प्रकरणांमध्ये अशाच पद्धतीने गुन्हे नोंदवले जात असल्याचे उत्तर गोवा जिल्हा पोलिस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही पोलिसांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.