Private Bus Hits Scooter: डिचोलीत खासगी प्रवासी बसची स्कूटरला धडक, एक महिला गंभीर; दुसरी थोडक्यात बचावली

Goa Private Bus Hits Scooter: बसस्थानकावरून बाहेर येताना खासगी प्रवासी बसगाडीने ठोकरल्याने स्कुटरवरील एक महिला जखमी झाली, तर अन्य एक महिला सुरक्षित बचावली.
Private Bus Hits Scooter
Private Bus Hits ScooterDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: बसस्थानकावरून बाहेर येताना खासगी प्रवासी बसगाडीने ठोकरल्याने स्कुटरवरील एक महिला जखमी झाली, तर अन्य एक महिला सुरक्षित बचावली. जखमी महिलेचा पाय मोडला असून तिला उपचारासाठी गोमेकॉत हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातात जीवितहानी टळली. हा अपघात आज सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास डिचोली बसस्थानका बाहेरील जंक्शनवर घडला. प्रवासी बस म्हापशाला जात होती. तर स्कुटर बसस्थानकाजवळील जंक्शन ओलांडून बसस्थानकाच्या मागच्या बाजूने जाण्याच्या प्रयत्नात होती. जखमी महिला पैरा येथील असून ती आणि तिची सहप्रवासी म्हावळींगे येथील नेस्ले कंपनीत कामाला आहे.

कामावरून सुटल्यानंतर दोघीही स्कुटरवरून म्हावळींगेहून घरी परतत होत्या. डिचोली बसस्थानकावरून प्रवासी बसगाड्या बाहेर घेतात, त्या जंक्शनवर स्कूटर पोचली होती. त्याचवेळी बसस्थानकावरून बाहेर घेण्याच्या नादात खासगी प्रवासी बसगाडीची स्कूटरला धडक दिली. या धडकेबरोबर स्कूटरवरील दोन्ही महिला रस्त्यावर पडल्या.

Private Bus Hits Scooter
Bison In Goa: लाखेरेत गव्यांचा धुमाकूळ, बागायती पिकांची नासधूस; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

त्यात चालक महिलेचा पाय मोडला. लागलीच इतर प्रवाशांनी अपघातस्थळी धाव घेतली. १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमी महिलेला उपचारासाठी डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी तीला बांबोळीत हलविण्यात आले.

Private Bus Hits Scooter
Goa Ujjwala Scheme: मंत्र्यांचा दणका बसताच अधिकाऱ्यांची धावपळ; 'गोवा उज्ज्वला'च्या अर्जांची चार तालुक्यांत छाननी पूर्ण, बुधवारपासून लाभार्थ्यांना मिळणार पैसे!

सर्वण येथे युवक जखमी

डिचोली-साखळी रस्त्यावरील सर्वण जंक्शनवर झालेल्या स्वयंअपघातात स्कूटरचालक जखमी झाला. सर्वण जंक्शनवरील ‘रम्बलर्स’वर तोल गेल्याने हा अपघात घडल्याचे कळते. जखमी युवकाला उपचारासाठी डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मूळ कर्नाटकमधील जखमी युवक गोकुळवाडा-सर्वण येथे राहत आहे. डिचोलीत घडलेल्या अपघातानंतर एका तासाच्या आत हा अपघात घडला. या अपघातामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही वेळ खोळंबली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.