Goa Congress RGP Alliance: जागावाटपाबाबत काँग्रेसकडून उशीर, 'आरजी'च्या बारा मतदारसंघांतील प्रमुखांसोबत बुधवारी बैठक

Goa Congress RGP alliance latest news: रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षातील (आरजी) मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्‍या गटांतील वाद वाढत असल्‍याने येत्‍या विधानसभा निवडणुकीत आमदार बोरकर राष्‍ट्रीय अध्‍यक्ष असलेल्‍या ‘आरजी’सोबत युती करण्‍यास काँग्रेसने चालढकल सुरू केली आहे.
Goa Congress RGP Alliance
Goa Congress RGP AllianceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षातील (आरजी) मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्‍या गटांतील वाद वाढत असल्‍याने येत्‍या विधानसभा निवडणुकीत आमदार बोरकर राष्‍ट्रीय अध्‍यक्ष असलेल्‍या ‘आरजी’सोबत युती करण्‍यास काँग्रेसने चालढकल सुरू केली आहे. जागावाटपाच्‍या बैठकीत ‘आरजी’ने मागितलेल्‍या बारा मतदारसंघांतील समित्‍यांच्‍या प्रमुखांसोबत काँग्रेस नेत्‍यांनी बुधवारी बैठकीचे आयोजन केले असून, त्‍यांचीही मते जाणून घेतली जाणार आहेत. त्‍यामुळे मागितलेल्‍यांपैकी किती जागा काँग्रेस देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आमदार वीरेश बोरकर यांनी स्‍वत:ला पक्षाचा राष्‍ट्रीय अध्‍यक्ष म्‍हणून जाहीर केल्‍यानंतर काँग्रेसने ‘आरजी’सोबत युतीच्‍या चर्चांना सुरवात केली. दोन्‍ही पक्षांच्‍या नेत्‍यांनी युती करण्‍याचे निश्‍चित केले आहे; परंतु जागावाटपाबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. प्राबल्‍य असलेले बारा मतदारसंघ ‘आरजी’ने काँग्रेसकडे मागितले आहेत.

Goa Congress RGP Alliance
Bison In Goa: लाखेरेत गव्यांचा धुमाकूळ, बागायती पिकांची नासधूस; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

परंतु काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव त्‍यांना बारा जागा सोडण्‍यास तयार नाहीत. त्‍यातच आता मनोज परब पुन्‍हा पक्षात प्रवेश करण्‍याचे निश्‍चित झाल्‍याने परब-बोरकर यांच्‍यातील वाद वाढण्‍याची शक्‍यता लक्षात घेऊन काँग्रेसने जागावाटपासंदर्भात चालढकल सुरू केली आहे.

त्‍याचवेळी बोरकर यांनी ज्‍या बारा जागा मागितल्‍या आहेत, त्‍या मतदारसंघांतील समित्‍यांच्‍या प्रमुखांशी गिरीश चोडणकर आणि इतर वरिष्‍ठ नेते बुधवारी बैठक घेणार असून, त्‍यात त्‍यांची मते जाणून घेण्‍यात येतील. त्‍यावरून ‘आरजी’ला किती जागा द्यायच्‍या हे ठरवले जाईल.

मात्र, जागावाटपाचा विषय जानेवारीपर्यंत रेंगाळत ठेवला जाईल, असे काँग्रेसच्‍या सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

Goa Congress RGP Alliance
Goa Ujjwala Scheme: मंत्र्यांचा दणका बसताच अधिकाऱ्यांची धावपळ; 'गोवा उज्ज्वला'च्या अर्जांची चार तालुक्यांत छाननी पूर्ण, बुधवारपासून लाभार्थ्यांना मिळणार पैसे!

केवळ तीन मतदारसंघ देण्‍याचा विचार

सद्यस्‍थितीत ‘आरजी’ला सांतआंद्रे, सांताक्रूझ आणि शिवोली हे तीन मतदारसंघ सोडण्‍याचा विचार काँग्रेसने केलेला आहे; परंतु सांताक्रूझ आणि शिवोलीतील काँग्रेस नेत्‍यांना या जागा सोडायच्‍या नाहीत. त्‍यामुळे काँग्रेस नेत्‍यांनी पुढील काही दिवस जागावाटपाबाबत मौनव्रत धारण करण्‍याचे निश्‍चित केले आहे, असेही सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.