Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सभापती रमेश तवडकरांवर काँग्रेसचा पक्षपाताचा आरोप

Goa Politics: प्रदेशाध्यक्ष पाटकर: मुख्यमंत्र्यांनी प्रश्‍नांना उत्तर देणे टाळले

दैनिक गोमन्तक

Goa Politics: नुकत्याच संपलेल्या सहा दिवसीय विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभापती रमेश तवडकर यांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. काँग्रेसच्या आणि विरोधी आमदारांना लोकांच्या विविध समस्या सभागृहात मांडण्यास सुरुवात केली.

परंतु सभापतींनी विरोधी आमदारांना कशी वागणूक दिली ही सर्व जनतेने पाहिल्याचेही त्यांनी नमूद केले. काँग्रेस भवनात सोमवारी सायंकाळी झालेल्या परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सुरुवातीला सार्वजनिक महत्त्वाचे मुद्दे मांडल्याबद्दल आणि विधानसभेत गोमंतकीयांचा आवाज उठविल्याबद्दल काँग्रेसच्या तिन्ही आमदारांचे अभिनंदन केले.

पत्रकार परिषदेला वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख, सरचिटणीस विजय भिके व कॅप्टन व्हिरीयातो फर्नांडिस उपस्थित होते. पाटकर म्हणाले, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता आणि आमदार ॲड. कार्लोस फेरेरा यांनी सहा दिवसांत प्रामाणिकपणाने कर्तव्य बजावले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने केवळ फसवेगिरी केली. मुख्यमंत्र्यांनी अपेक्षीत उत्तरेही दिली नाहीत. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तवडकर यांनी आपल्याच मंत्र्यांविषयी विविध संस्थांना दिलेल्या निधीविषयी चौकशी करण्याची मागणी केली होती.

पुढे हा विषय पक्षांतर्गत असल्याचे सांगितले गेले. सरकारकडे विविध सरकारी विभागांकडून जवळपास ५ हजार कोटींची मोठी वसुली प्रलंबित आहे. यामध्ये २७१.७५ कोटींची खाण थकबाकी, २३०.३५ कोटींची गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण उपकर, हरित उपकराची वसुली बाकी आहे.

त्याशिवाय औद्योगिक, व्यावसायिक आणि सरकारी थकबाकीदारांकडून १ हजार ४६० कोटींची वीज बिलांची वसुली बाकी असल्याचे स्पष्ट आहे, तरीही सरकार थकबाकी वसूल करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मंत्रीमंडळ शपथविधी, जुवारी पुलांचे उद्घाटन, पर्पल फेस्ट, मेगा जॉब फेअर, इफ्फी यावर सरकारने ५०० कोटींची उढळपट्टी केली. राज्यावर ३५ हजार कोटींचे कर्ज झाले असून, प्रति दरडोई २.२० लाखांचे कर्ज सरकारने टाकलेले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

Mati Bhram Yog: धन हानी अन् नात्यांमध्ये दुरावा! बुध-चंद्र युतीमुळे 3 राशींवर ओढावणार मोठे संकट; गुंतवणूक करताना 100 वेळा विचार करा

Goa Taxi New Fare Rates: गोव्यात टॅक्सी प्रवासाचे नवे दर लवकरच लागू! पहिल्या 3 किमीला 300, 3 ते 8 किमीला 445 रुपये

SCROLL FOR NEXT