Goa Taxi New Fare Rates: गोव्यात टॅक्सी प्रवासाचे नवे दर लवकरच लागू! पहिल्या 3 किमीला 300, 3 ते 8 किमीला 445 रुपये

Goa Taxi Fare Latest Update: वाहनाच्या प्रकारानुसार दरात बदल होण्याची शक्यता असून, या दरांची अधिकृत अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे.
Goa Taxi Fare Latest Update
Goa Taxi New Fare RatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील टॅक्सींसाठी सरकारकडून निश्चित केलेल्या नव्या दरानुसार पहिल्या तीन किलोमीटरसाठी ३०० रुपये, तीन ते आठ किलोमीटरसाठी ४४५ रुपये, तर त्यापुढील अंतरासाठी प्रतिकिलोमीटर दर आकारला जाणार आहे.

वाहनाच्या प्रकारानुसार दरात बदल होण्याची शक्यता असून, या दरांची अधिकृत अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. प्रवाशांना आकारण्यात येणाऱ्या भाड्यात पारदर्शकता आणण्यासाठी टॅक्सीमध्ये ‘क्यूआर कोड’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टॅक्सी व्यावसायिकांना अ‍ॅपआधारित व्यवस्थेत सहभागी होण्याबाबत अनुत्सुकता होती.

Goa Taxi Fare Latest Update
Goa Politics: 'मगो पक्षाने राजकीय मर्यादा ओळखाव्यात!' CM सावंतांचा मित्रपक्षाला सूचक टोला; मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यास स्पष्ट नकार

त्यामुळे सरकार, प्रवासी आणि टॅक्सी व्यावसायिक यांच्यातील मध्यम मार्ग म्हणून ‘क्यूआर कोड’वर आधारित ही व्यवस्था पुढे आणण्यात आली आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व टॅक्सीमालकांसाठी एक समान डिजिटल व्यासपीठ उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा टॅक्सी व्यावसायिकांचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी ही व्यवस्था टॅक्सी व्यावसायिकांकडूनच सुचविण्यात आल्याचे सांगितले.

टॅक्सीचालकांनी जादा भाडे आकारल्याचे आरोप प्रवाशांकडून केले जातात. क्यूआर कोडमुळे सरकारने निश्चित केलेले दर थेट प्रवाशांना पाहता येणार असल्याने अशा तक्रारी आणि आरोपांना आळा बसण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

Goa Taxi Fare Latest Update
Goa Police Vacancies: गोवा पोलिसात 'DSP'ची तब्बल 58 पदे रिक्त! 'खाकी'वर वाढला कामाचा ताण; सरदेसाईंचे मुख्य सचिवांना पत्र

मीटर होणार इतिहासजमा

नव्या व्यवस्थेत टॅक्सीचे मीटर वापरण्याची पद्धत बंद होणार आहे. त्याऐवजी सरकारने निश्चित केलेले दर लागू केले जातील. हेच दर ‘गोवा माईल्स’ सेवेलाही लागू करण्यात येणार असल्याचे आमदार लोबो यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वीच प्रवाशाला आकारले जाणारे भाडे समजण्यास मदत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com