Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

Michael Lobo Bardez Development: गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यावर भर दिला जात आहे.
Michael Lobo Bardez Development
Bardez DevelopmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यावर भर दिला जात आहे, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.

म्हापसा शहरासह संपूर्ण बार्देश तालुक्याच्या पायाभूत विकासासाठी महामंडळामार्फत आवश्यक ते पूर्ण सहकार्य केले जाईल. स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने म्हापसा तसेच बार्देशचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केला.

Michael Lobo Bardez Development
Goa Taxi New Fare Rates: गोव्यात टॅक्सी प्रवासाचे नवे दर लवकरच लागू! पहिल्या 3 किमीला 300, 3 ते 8 किमीला 445 रुपये

‘जीएसआयडीसी’मार्फत सध्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला असून, प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे, असे लोबो यांनी सांगितले. विकासकामे केवळ शहरांपुरती मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातील रस्ते, पूल, आरोग्य केंद्रे आणि अन्य आवश्यक पायाभूत सुविधांनाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘बार्देश भवन’मुळे पार्किंगला दिलासा

म्हापसा-मरड येथे सुमारे ११० कोटी रुपये खर्चून ‘बार्देश भवन’ प्रशासकीय संकुल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या बहुमजली इमारतीत सुमारे १९० चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. म्हापसा शहरातील विविध ठिकाणी विखुरलेली सरकारी कार्यालये एकाच छताखाली आणण्यात येणार असल्याने शहरातील वाहतूक व पार्किंगची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. प्रस्ताव आर्थिक मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, असे मायकल लोबो यांनी सांगितले.

Michael Lobo Bardez Development
Goa Politics: 'मगो पक्षाने राजकीय मर्यादा ओळखाव्यात!' CM सावंतांचा मित्रपक्षाला सूचक टोला; मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यास स्पष्ट नकार

ग्रामीण विकासाला चालना

‘जीएसआयडीसी’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रलंबित विकासकामांना चालना देण्यात येणार आहे. गरजेनुसार नवीन रस्ते, पूल आणि आरोग्य केंद्रे उभारण्याचे नियोजन आहे. पत्रादेवी येथील स्वातंत्र्यसैनिक स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मडगाव येथील आयुष रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून, ते लवकरच हस्तांतरित करण्यात येणार आहे. वास्कोसह राज्यातील सुमारे पाच प्रकल्प लोकार्पणासाठी तयार असल्याची माहिती मायकल लोबो यांनी दिली.

बोडगेश्वर रस्त्याचे रुंदीकरण

म्हापशातील बोडगेश्वर मंदिरापासून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, पेडणे, डिचोली आणि बार्देशच्या विविध भागांतून म्हापशात येणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांना त्याचा लाभ होईल. आगामी दोन वर्षांत वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल, असा मायकल लोबो यांनी आला. म्हापसा बसस्थानकाचेही टप्प्याटप्प्याने सुशोभीकरण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Michael Lobo Bardez Development
Goa Police Vacancies: गोवा पोलिसात 'DSP'ची तब्बल 58 पदे रिक्त! 'खाकी'वर वाढला कामाचा ताण; सरदेसाईंचे मुख्य सचिवांना पत्र

गोव्याबाहेरील प्रकल्पांवर भर

‘जीएसआयडीसी’ची आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी गोव्याबाहेरील राज्यांतील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याचा विचार आहे. या प्रकल्पांतून मिळणारा अतिरिक्त महसूल गोव्यातील विकासकामांसाठी वापरण्यात येईल. त्यामुळे महामंडळाची व्यावसायिक क्षमता वाढण्यासह राज्यातील प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. सर्व विकासकामांमध्ये गुणवत्ता व पारदर्शकता राखण्यावर भर देणार, असे लोबोंनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com