Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Allahabad High Court Custodial Torture Ruling: पोलीस कोठडीत आरोपींना बांधून अमानुष मारहाण केल्याच्या अत्यंत गंभीर प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.
Allahabad High Court Custodial Torture Ruling
Allahabad High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Allahabad High Court Custodial Torture Ruling: पोलीस कोठडीत आरोपींना बांधून अमानुष मारहाण केल्याच्या अत्यंत गंभीर प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. न्यायाधीशांनी कठोर शब्दांत ताशेरे ओढताना स्पष्ट केले की, पोलीस कोठडीत आरोपींना दोरीने बांधून बेदम मारहाण करणे ही कोणत्याही परिस्थितीत पोलिसांची ऑफिशियल ड्युटी मानली जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती मदन पाल सिंह यांच्या एकल पीठाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल देताना, पोलीस कर्मचाऱ्यांची डिस्चार्ज अर्जी फेटाळणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे योग्य ठरवून तो कायम ठेवला.

हे संपूर्ण प्रकरण मे 2022 मधील असून, बांदा जिल्ह्यातील एका प्रकरणात नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर ग्रामस्थांनी शिवीगाळ, मारहाण आणि दगडफेक केल्याचा आरोप होता. या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस दलाने गावात धाड टाकून चार महिलांसह आठ जणांना अटक केली होती. मात्र, तक्रारदाराने आरोप केला होता की, पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या आठही जणांना दोरीने बांधून, पाठीवर आणि पोटावर पाडून नितंब, जांगा आणि पायांवर लाठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत सर्व आठही जणांच्या शरीरावर गंभीर दुखापती आणि सूज असल्याचे निष्पन्न झाले होते.

Allahabad High Court Custodial Torture Ruling
Karnataka High Court: 'आई-वडिलांची सेवा करणं मुलगा-मुलीची जबाबदारी, जावई-सुनेची नाही', पत्नीच्या स्वातंत्र्यावर हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

न्यायालयात आरोपी पोलीस (Police) कर्मचाऱ्यांनी सीआरपीसीच्या कलम 197 अन्वये कायदेशीर संरक्षणाचा दावा केला होता. सरकारी कर्तव्य बजावताना ही घटना घडल्यामुळे खटला चालवण्यापूर्वी सरकारची पूर्वमंजुरी आवश्यक असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. परंतु, उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद धुडकावून लावला आणि लोकांना बांधून मारहाण करणे हे गंभीर स्वरुपाचे कृत्य असून ते अधिकृत कर्तव्यात येत नाही, असे स्पष्ट केले.

Allahabad High Court Custodial Torture Ruling
Karnataka High Court: पुराव्यांचा विचार करत कोर्टाचा मोठा निर्णय! माजी आमदार लवू मामलेदार मृत्यू प्रकरणातील संशयिताची याचिका फेटाळली

पोलिसांच्या जनरल डायरीमध्ये नोंदवलेले 'अटकेदरम्यान पडल्यामुळे दुखापती झाल्याचे' स्पष्टीकरण न्यायालयाने पूर्णपणे निरर्थक ठरवले. भादंवि (IPC) 354 सारख्या गंभीर कलमांखालील खटल्यातून सुटका मिळवण्यासाठी दाखल केलेल्या दोन्ही गुन्हेगारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावत आरोपी पोलिसांविरोधात खटला चालवण्याचा मार्ग मोकळा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com