Goa Politics: मडगावात राजकीय बदल हवा

Goa Politics: चिराग नायक : 24 वर्षांपासून शहराची जैसे थे स्थिती
Margao News
Margao NewsDainik Gomantak

Goa Politics: मडगावमध्ये मागच्या 20- 25 वर्षांत मडगावचा आमदार एकच आहे. मात्र या कालावधीत मडगाव मतदारसंघात लक्षणीय असे कोणतेच बदल झालेले दिसत नाहीत. उलट मडगाव आपली ओळख गमावून तर बसणार नाही ना? अशी चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे आता मडगावात राजकीय बदल होणे, ही काळाची गरज असून सर्व मडगावकरांचे हे मत आहे, अशी परखड प्रतिक्रीया युवा उद्योजक चिराग नायक यांनी व्यक्त केली.

मडगाव मतदारसंघात यंदा विधानसभेची पोटनिवडणूक झाली तर आपण ही निवडणूक लढविणार अशी घोषणा नायक यांनी दोन दिवसापूर्वी केली होती. या पाश्र्वभूमीवर आज गोमंतक टीव्हीच्या ''शाष्टीकार'' या लोकप्रिय कार्यक्रमात नायक यांची मुलाखत घेतली असता त्यांनी आपली भूमिका परखडपणे मांडली.

काही पक्ष आपल्या संपर्कात आहेत आणि तो कुठला पक्ष ते कदाचित मी या महिन्याअखेर जाहीर करू. पण पोटनिवडणूक झाल्यास मी निवडणूक लढविणार हे निश्चित असे त्यांनी सांगितले. ‘गोमन्तक’चे ब्यूरो चीफ सुशांत कुंकळ्येकर यांनी ही मुलाखत घेतली असून गोमंतक टीव्हीच्या ‘यु ट्यूब’ आणि फेसबुक पेजवर ही मुलाखत उपलब्ध आहे.

Margao News
Margao News: मडगाव उपनगराध्यक्ष निवड उद्या

रस्ते बांधले आणि फुटपाथ उभारले म्हणून विकास होत नाही. शहराचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. शैक्षणिक, औद्योगीक, पर्यटन या दृष्टीने वाढण्याची पुरेपूर क्षमता मडगाव शहरात आहे. मात्र त्या दृष्टीने आजवर कुणी विचारच कुणी केला नाही.

२४ वर्षांपूर्वी कुणी एखाद्या मुलाने मडगाव शहराला भेट दिली असेल आणि त्याने आज परत या शहराला भेट दिली, तर त्याला कोणताच बदल झालेला दिसून येणार नाही.

ही गोष्ट मडगावकरांसाठी भूषण ठरणारी आहे का? असा सवाल त्यांनी केला. माझे मडगावसाठी एक व्हिजन आहे आणि ते पुढे नेण्यासाठीच मी निवडणूक लढवू पहात आहे.

Margao News
Goa Crime News: कुंकळ्ळीतून बेपत्ता झालेली ‘ती’ भावंडे अखेर सापडली!

माझी ही भूमिका मी घरच्या माणसाकडेही स्पष्ट केलेली आहे असे त्यांनी सांगितले. चिराग नायक यांचे वडील दत्ता नायक हे दिगंबर कामत यांचे जिगरी दोस्त मानले जातात. आणि जर यदाकदाचित मडगावात पोट निवडणूक झाली तर भाजप उमेदवारीवरून कामत यांचे चिरंजीव योगीराज हे निवडणुक लढवतील असे सांगीतले जाते.

अशा परिस्थीतीत तुमच्या वडिलांनी तुम्ही ही निवडणूक लढवू नये असे दडपण आणले तर असा प्रश्र्न केला असता, योगीराज हा माझा स्वतःचा खास मित्र आहे. मी माझी भूमिका त्यांनाही समजावून सांगणार असे ते म्हणाले.

...चल या फुडें!

नायक यांनी आपण पोटनिवडणूक लढणार अशी घोषणा केल्यावर ती बातमी व्हायरल झाली, त्यावेळी एकाने त्यावर ''चल या फुडें'' अशी कमेंट केली होती. ''चल या फुडें'' हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे तुम्ही गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार का? असे विचारले असता, विजय सरदेसाई यांची काम करायची स्टाईल मला आवडते. त्यांनी फातोर्ड्यात जो नियोजनपूर्वक विकास केला आहे, ते स्पष्टपणे दिसून येते. मडगाव मतदारसंघाची सीमा कधी संपते आणि फातोर्ड्याची सीमा कधी सुरू होते, हे दोन्ही मतदारसंघाची स्थिती पाहिल्यास सहज लक्षात येते. विजय हा माझा मित्र असला तरी मी त्यांच्या पक्षावर निवडणूक लढवणार, असे होत नाही, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com