Mopa Airport:  Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपा विमानतळाच्या नावाबाबत पुन्हा संभ्रम; सरकारी जाहिरातीतूनच वगळले 'मनोहर' नाव

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नामकरण होऊनही आता सर्वसामान्यांमध्ये पुन्हा संभ्रम

Akshay Nirmale

Mopa Airport: गोवा राज्य सरकारने मोठ्या थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी मोदींच्याच हस्ते या विमानतळाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सन्मानार्थ 'मनोहर' असे नाव देण्यात आले होते. त्यामुळे या विमानतळाला काय नाव द्यायचे या वादावर पडदा पडला होता. तथापि, आता सरकारी जाहिरातीमध्येच या विमानतळाचे मनोहर हे नाव वगळल्याने पुन्हा या विमानतळाच्या नावाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (गोवा पर्यटन विकास महामंडळ) ची ही जाहिरात गुरूवारी गोव्यातील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. यात या विमानतळाचा उल्लेख केवळ मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ असा आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे नामकरण होऊनही सरकारी जाहिरातीतून मनोहर नाव वगळल्याने या विमानतळाच्या नावाबाबत सर्वसामान्यांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

या जाहीरातीत विमानतळाच्या जुन्या नावाचाच उल्लेख आहे. त्यामुळे मनोहर पर्रीकर यांच्या समर्थकांमध्येही नाराजी निर्माण झाली आहे. खरेतर या विमानतळाला कोणाचे नाव द्यावे, यावरून गेल्या काही काळात गोव्यात जनमानस ढवळून निघाले होते. काही संघटनांनी या विमानतळाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद तथा भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी सर्वप्रथम झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचेही नाव समोर आले. तर आणखी एका गोटातून या विमानतळाला गोव्याचे पहिले विरोधी पक्षनेते जॅक सीक्वेरा यांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

इतर नावांकडे दुर्लक्ष करत 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोपा विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी या विमानतळाला मनोहर असे नाव देण्यात आल्याचे जाहीर केले गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT