Sahitya Akademi Award: कोंकणी लेखिका माया खरंगटे यांंच्या कादंबरीला ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार

एक लाख रुपये, साहित्य अकादमीचे मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप
Sahitya Academy Award
Sahitya Academy AwardDainik Gomantak
Published on
Updated on

Sahitya Akademi Award: केंद्रीय साहित्य अकादमीच्या मुख्य पुरस्कारांची आज घोषणा झाली. यामध्ये ज्येष्ठ कोंकणी लेखिका माया खरंगटे (Maya Kharangate) यांना त्यांच्या अमृतवेल (2016) या कादंबरीसाठी 2022चा मुख्य साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाला आहे. एक लाख रुपये, साहित्य अकादमीचे मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Sahitya Academy Award
Goa Police : मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर पोलिस ऍक्शन मोडमध्ये; 11 अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांवर कारवाई

साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी 22 भारतीय भाषांतील सर्वोत्तम साहित्याला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. डिसेंबर महिन्यामध्ये या 22 भाषांतील पुरस्कारांची घोषणा होते. कोकणी साहित्यासाठी यावर्षी ज्येष्ठ कोकणी साहित्यिका आणि कोकणी भाषेच्या कार्यकर्त्या माया खरंगटे यांना जाहीर झाला आहे; तर मराठी भाषेसाठीचा पुरस्कार प्रवीण बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेचा गणपती' या कादंबरीसाठी जाहीर झाला आहे.

Sahitya Academy Award
Goa Rent a Car: कळंगुट येथे खासगी गाड्या परदेशी पर्यटकांना भाड्याने देणाऱ्या दोघांना अटक

हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भावना व्यक्त करताना माया खरंगटे म्हणाल्या की, आजवर कोंकणी साहित्याच्‍या केलेल्या सेवेचे हे फळ आहे, असे मानत या पुरस्काराचा मी विनम्रपणे स्वीकार करत आहे. पुरस्कारासाठी कोणीही साहित्य लिहित नसतो; पण पुरस्कारामुळे त्याला नक्कीच बळ, उत्साह आणि उमेद मिळते. माझीदेखील भावना यापेक्षा फार वेगळी नाही. कथा, कादंबरी अशा वेगवेगळ्या प्रकारचे लेखन मी सातत्याने करत आहे. पण, साहित्य अकादमीचा पुरस्कार मला कादंबरीसाठी मिळाला हे माझ्यासाठी फार विशेष आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com