Rented cars
Rented carsDainik Gomantak

Goa Rent a Car: कळंगुट येथे खासगी गाड्या परदेशी पर्यटकांना भाड्याने देणाऱ्या दोघांना अटक

वाहन मालकांवर पोलिसांची कारवाई; महिंद्रा थर, यामाहा फासिनो जप्त
Published on

Goa Rent a Car: गोव्यातील सुप्रसिद्ध कळंगुट येथे परदेशी पर्यटकांना रेंट ऑन कार या सेवेत खासगी गाड्या देणाऱ्या दोघा वाहनमालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या वाहनमालकांच्या महिंद्रा थर (GA-07-L-9874) आणि यामाहा फासिनो (GA-03-AN-0785) या दोन गाड्याही जप्त केल्या आहेत.

Rented cars
IIT Goa : मुख्‍यमंत्र्यांच्या वक्तव्‍यानंतर कोठार्लीत आनंदोत्‍सव; सांगेत मात्र संभ्रम

वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी राज्य सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. अल्पवयीन चालकाच्या पालकांवरच थेट कारवाई केली जाणार आहे. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या वाहनमालकावर कारवाई होणार आहे. याशिवाय नोंदणी असणाऱ्या व्यावसायिकांनाच कार किंवा बाईक भाडेतत्वावर देता येणार आहेत. मात्र खासगी वाहने पर्यटकांना भाड्याने दिल्यास, वाहनमालकावर कारवाई करण्याची तसेच ही वाहने कायमस्वरूपी जप्त करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर दिला होता.

Rented cars
Goa Crime : पर्यटकांनो गोव्यात येताय तर सावधान! एस्कॉर्ट सेवेच्या नावाखाली लुटीच्या प्रकरणांमध्ये वाढ

गोवा ही भारताची पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच देशासह जगभरातून पर्यटकांचा ओढा गोव्याकडे असतो. या पर्यटकांना गोवा भ्रमंती सोयीची व्हावी म्हणून येथे रेंट ऑन कार आणि रेंट ऑन बाईक या सेवा येथे व्यावसायिकांकडून दिल्या जातात. तथापि, या सेवा देताना काही नियम पाळावे लागतात. उदाहरणार्थ अशा सेवेमध्ये दिल्या जाणाऱ्या कार किंवा बाईक यांना पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असते. त्यावरून या गाड्या या सेवेतील आहेत, हे ओळखता येते.

तथापि, काही व्यावसायिक जेव्हा त्यांच्याकडील रेंट वर देण्याच्या गाड्या संपतात किंवा काही पर्यटकांची गरज म्हणूनही हे व्यावसायिक खासगी गाड्या देतात. पण ते नियमाला धरून नाही. शिवाय नोंदणी असणाऱ्यांना हा व्यवसाय करता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com