Goa Comunidade land Dainik Gomantak
गोवा

Goa Comunidade land: कोमुनिदादच्या जागेतून रस्ता नको, हळदोण्यातील गावकऱ्यांनी आमसभेत घेतला निर्णय

Gated Villa Construction: ''कोमुनिदाद ऑफ फ्रेटरनल दे अल्दोना''च्या गावकऱ्यांनी एकमताने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: ''कोमुनिदाद ऑफ फ्रेटरनल दे अल्दोना''च्या गावकऱ्यांनी एकमताने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यापुढे खासगी जमीनमालक, बिल्डर्स किंवा इतर कोणत्याही घटकांना त्यांच्या प्रकल्पांसाठी कोमुनिदादच्या जमिनीतून रस्त्यासाठी जागा न देण्याचा ठराव रविवारी झालेल्या आमसभेत मंजूर करण्यात आला.

हळदोणा कोमुनिदादचे अध्यक्ष ग्लेन बोकारो यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष आमसभा पार पडली. या बैठकीला अटर्नी चागास कार्व्हालो आणि एस्क्रीव्हाव सुदेश शिरोडकर प्रामुख्याने उपस्थित होते. या आमसभेत आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आणि राणोई येथील मानस गेटच्या दुरुस्तीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीदरम्यान गावकरी आणि इतर घटकांकडून कोमुनिदादच्या जमिनीतून रस्त्याचे हक्क देण्याबाबतचे एक पत्र सादर करण्यात आले होते; परंतु यावर गावकऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. गेल्या चार वर्षांत हळदोणा गावात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

या अनिर्बंध विकासामुळे गावातील वीज, पाणी आणि वाहतूक कोंडी यांसारख्या पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत असून, गावातील नैसर्गिक संसाधनांचे अतोनात नुकसान होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. निवासी प्रकल्पांचा हा ओघ असाच सुरू राहिला, तर भविष्यात स्थानिक नागरिकांनाच आपल्या गावातून विस्थापित व्हावे लागेल, अशी भीतीही काहींनी व्यक्त केली.

अनेक खासगी जमीनमालक, बिल्डर्स आणि काही गावकरीसुद्धा, ज्यांच्या जमिनीला मुख्य रस्त्याची जोडणी नाही, ते बहुनिवासी व्हिला प्रकल्पांच्या बांधकामासाठी कोमुनिदादकडे ६ ते ८ मीटर रुंद रस्त्याची मागणी करत असतात, ही बाब गावकऱ्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिली. या संदर्भात बोलताना कोमुनिदादचे अटर्नी चागास कार्व्हालो म्हणाले की, गेल्या दोन-तीन वर्षांत विशेषतः कारोना आणि खोर्जुवे भागांत मोठ्या संख्येने बिल्डर्सनी शिरकाव केला असून, तेथे खासगी जलतरण तलाव असलेले आलिशान व्हिला बांधले जात आहेत.

अशा प्रकारच्या मोठ्या बांधकाम उपक्रमांमुळे गावातील सध्याच्या पायाभूत सुविधांवर विपरीत परिणाम होईलच; शिवाय, येणाऱ्या पिढ्यांचेही मोठे नुकसान होईल. त्यामुळे, ज्या प्रकल्पांना रस्त्यांची आवश्यकता आहे अशा कोणत्याही प्रकल्पासाठी कोमुनिदादची जमीन न देण्याचा निर्णय आम्ही सामूहिकपणे घेतला आहे. यापुढे कोणालाही कोमुनिदादच्या जमिनीतून रस्ता दिला जाणार नाही, असे कार्व्हालो यांनी स्पष्ट केले.

राणोई येथील स्लुईस गेटची होणार दुरुस्ती

जमिनीच्या मुद्द्याव्यतिरिक्त, या बैठकीत राणोई येथील अत्यंत दुरवस्थेत असलेल्या स्लुईस गेट (मानशीचे दरवाजे) आणि बांधाच्या दुरुस्तीवरही चर्चा झाली. शेतजमिनीत खाऱ्या पाण्याचा शिरकाव रोखण्यासाठी कोमुनिदादच्या स्वतःच्या निधीतून या स्लुईस गेटची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT