

पणजी: नगरनियोजन खात्याने (टीसीपी) आणखी सुमारे २.०१ कोटी चौरस मीटर जमीन नो डेव्हलमेंट क्षेत्रात (एनडीझेड) आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य नगरनियोजक वर्टिका डागुर यांनी याबाबतची अधिसूचना जारी केलेली आहे.
अधिसूचनेनुसार, तिसवाडीतील कालापूर, करंबळी, गासई, तळावली, गवळीमौळा, डिचोलीतील म्हावळींगे, बार्देशमधील गिरी आणि साल्वादोर द मुंद, पेडण्यातील तेरेखोल, हरमल, पालये तसेच पेडणे, फोंड्यातील बेतोडा, प्रियोळ यांसह दाबोळी, कुठ्ठाळी, कुंकळ्ळी आणि सांकवाळ या गावांतील २,०१,२४,११९ चौरस मीटर जमीन रुपांतरित करण्यासंदर्भात टीसीपीकडे अर्ज सादर झालेले होते.
परंतु, या जमिनी शेतीचे क्षेत्र, डोंगरउतार, जंगले, खाजन, नदीकाठ आणि पाणथळ जागा आदींसारख्या संवेदनशील भागांमध्ये येत असल्याने ही जमीन ‘एनडीझेड’मध्ये आणण्याचा निर्णय टीसीपीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून, त्याबाबत सूचना आणि हरकती सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदतही देण्यात आलेली आहे. टीसीपीच्या या निर्णयामुळे राज्यातील खाजन जमीन, खारफुटी, खासगी जंगल तसेच मिठागरे असलेल्या भागांतील जमिनींचे रक्षण होणार आहे. याआधी काहीच दिवसांपूर्वी सुमारे १० कोटी जमीन खात्याने ‘एनडीझेड’मध्ये आणली होती.
गाव क्षेत्र (चौरस मीटर)
कालापूर ९,२७,६५१
करंबळी २९,२४,९२१
म्हावळींगे ८०,९२६
गिरी ११,६०,०००
साल्वादोर द मुंद १,५०,३०,६२१
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.