Goa Comunidade land: जमीन घोटाळा प्रकरणी सावंत गावकर आक्रमक; सर्वण कोमुनिदादची जमीन, गावकऱ्यांनी अखेर उभारला फलक

Sarvan Comunidade land scam: सर्वण कोमुनिदादच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी आक्रमक झालेल्या सावंत गावकऱ्यांनी अखेर आज सायंकाळी संबंधित कोमुनिदादच्या जमिनीत फलक लावला.
Sarvan Comunidade land scam
Sarvan Comunidade land scamDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: सर्वण कोमुनिदादच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी आक्रमक झालेल्या सावंत गावकऱ्यांनी अखेर आज सायंकाळी संबंधित कोमुनिदादच्या जमिनीत फलक लावला. ‘अतिक्रमण करण्यास प्रतिबंध’ असे फलकावर ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.

फलक लावण्यात आल्यानंतर त्याठिकाणी जमलेल्या सावंत गावकऱ्यांनी डिचोली पोलिस स्थानकात जाऊन कोमुनिदादच्या जमिनीत एका बांधकाम कंपनीकडून बेकायदेशीरपणे अतिक्रमण झाले आहे. या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी लेखी तक्रार दाखल केली. सर्वण कोमुनिदादच्या कथित जमीन घोटाळाप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सर्वण गावात वातावरण खदखदत आहे.

Sarvan Comunidade land scam
Sarvan Comunidade Land Scam: देवा, घाेटाळेबहाद्दरांना चांगलीच अद्दल घडव! सर्वण ग्रामस्‍थांचे गाऱ्हाणे, कोमुनिदाद जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश होणार?

या कथित घोटाळ्याची भांडाफोड करण्यासाठी कोमुनिदादशी संबंधित बहुतांश युवक मिळून सावंत गावकरी पेटून उठले आहेत. गेल्या शुक्रवारी बैठकीत ठरल्याप्रमाणे (रविवारी) सायंकाळी संघटीत झालेल्या सावंत गावकऱ्यांनी बेकायदेशीरपणे विक्री झाल्याचा संशय असलेल्या कोमुनिदादच्या सर्व्हे नं. १९/२ या जागेकडे मोर्चा वळविला.

नंतर त्या ठिकाणी मालमत्ता कोमुनिदादची असल्याचा फलक लावला. यावेळी ५० हून अधिक सावंत गावकर उपस्थित होते. मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र झाल्याने पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, पोलिस नेमके कोणाच्या सांगण्यावरून आले, ते समजू शकले नाही.

Sarvan Comunidade land scam
Goa Land Grab Scam: सुलेमान खानला अखेर जामीन मंजूर! हस्ताक्षराचा अहवाल ठरला गेमचेंजर; मेरशी सत्र न्यायालयाचा निर्णय

गावात खदखदतेय घोटाळा प्रकरण

सर्वण कोमुनिदादची जमीन बेकायदेशीरपणे परस्पर विकण्याचा प्रकार घडला असून या गैरव्यवहारातून मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे, असा गावकऱ्यांना संशय आहे. हा घोटाळा उघड झाल्यानंतर सर्वण गावात खळबळ माजली असून गेल्या काही महिन्यांपासून हे घोटाळ्याचे प्रकरण गावात खदखदत आहे. या घोटाळ्याची भांडाफोड करण्यासाठी कोमुनिदादचे सदस्य असलेले सावंत गावकरी संघटीत झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Comunidade Land Grab Allegations
Goa Land Grab Scam
Bicholim Land Fraud Goa
Sarvan natural spring extinction
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com