CM Pramod Sawant  X
गोवा

Goa Assembly: मुंडकारांना सरकार पूर्णत: संरक्षण देईल! वीज,पाणी तोडण्याचा प्रयत्न केल्यास तक्रार करा; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Goa Mundkar Homes: महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले, की नव्याने मुंडकार खटले दाखल होत आहेत. जुन्या २ हजार ५०० खटल्यांपैकी २ हजार ३०० खटले निकाली काढण्यात आले.

Sameer Panditrao

Goa Assembly Budget Session 2025

पणजी: राज्यात मुंडकारांच्या घरांची वीज वा पाणी तोडण्याचा प्रयत्न कोणी केल्यास पोलिसांत तक्रार करा. मुंडकारांना याबाबतीत सरकार पूर्णत: संरक्षण देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिली.

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी याविषयीचा मूळ प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले, की नव्याने मुंडकार खटले दाखल होत आहेत. जुन्या २ हजार ५०० खटल्यांपैकी २ हजार ३०० खटले निकाली काढण्यात आले. नव्या १ हजार ८०० खटल्यांवर सुनावणी सुरू आहे. मामलेदारांनी शनिवारी न्यायालये चालवावीत. खटल्यांच्या

दोन तारखांमध्ये १० दिवसांपेक्षा जास्त कालावधी नको आणि तीनहून त्यापेक्षा जास्त वर्षे खटल्यांवर दैनंदिन सुनावणी घ्यावी, असा आदेश जारी केला आहे. वीज, पाणी जोडणीसाठी वेगळा ना हरकत दाखला नको. घराचा आकार न बदलता घर दुरुस्ती करता येईल. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी, भाटकार सतावणूक करतो, याकडे लक्ष वेधले. कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी ७ वर्षे जुने खटलेही प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधले.

... तर ‘त्या’ महिलेच्या घराला संरक्षण

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर म्हणाले, सरकारने आश्वासन दिले म्हणून एका ज्येष्ठ नागरिक मुंडकार महिलेच्या घराशेजारी शौचालय बांधले. आता जमीनमालकाने तक्रार केली म्हणून गटविकास अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधकामाचा अहवाल पंचायत सचिवांकडे मागितला आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, घरापासून तीन मीटरच्या आत शौचालय असेल तर कारवाई होणार नाही. त्याला संरक्षण दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT