Goa Assembly 2025: राजरोसपणे कॅसिनोत सुरुये 'लाईव्ह गेमिंग', आलेमाव म्हणाले... जुगार, ड्रग्जमुळे होतेय गोव्याची प्रतिमा मलीन

Goa Live Gaming Casino Issue: राज्यातील विधानसभा अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, आज (२५ मार्च) अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे.
Goa Assembly 2025
Goa Assembly 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील विधानसभा अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, आज (२५ मार्च) अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. २४ मार्च ते २६ मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे. दरम्यान, आज सभागृहात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लाईव्ह गेमिंग करणाऱ्या कॅसिनोंचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरलं.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या मुद्यावर अधिक आक्रमक भूमिका घेत, राज्यात पूर्णवेळ गेमिंग आयुक्त नेमण्याची मागणी केली. यामुळं गोव्यातील गेमिंग उद्योगावर नियंत्रण ठेवता येईल. तसंच अनधिकृत किंवा बेकायदेशीर प्रकारांना आळा घालता येईल, असं मत युरी आलेमाव सभागृहात व्यक्त केलं.

गोवा राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध असलं तरी, कॅसिनोंमुळे गोव्याची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप युरी आलेमाव यांनी केला. गोवा फिरण्यासाठी आणि मजा करण्यासाठी नव्हे, तर जुगार, ड्रग्ज, अमली पदार्थ आणि वेश्याव्यवसायासाठी ओळखला जात आहे," असा हल्लाबोल युरी आलेमाव यांनी सरकारवर केला.

Goa Assembly 2025
Goa Crime: दक्षिण गोव्यात 2 महिन्यात 6 लैंगिक अत्याचाराच्या घटना! वासनांधांकडून  होतेय कोवळ्या मुलींचे शोषण

जमिनीवरील कॅसिनोंकडून ३५० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा मुद्दाही त्यांनी सभागृहात उपस्थित केला. जमिनीवरील कॅसिनोंकडून थकबाकी वसूल होईपर्यंत संबंधित कॅसिनोंचे परवाने रद्द करण्याची मागणी युरी आलेमाव यांनी सरकारकडे केली.

कॅसिनोंच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, "राज्यात लाईव्ह गेमिंगला कोणतीही परवानगी नाही. असे प्रकार समोर आल्यास संबंधित कॅसिनोंचे परवाने काही काळासाठी निलंबित केले जातील. गेमिंग कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com