Raj Ram Chodankar Dainik Gomantak
गोवा

CM Shaurya Award: शिवोलीतील राज चोडणकरला मुख्यमंत्री शौर्य पुरस्कार; दोन पर्यटकांना दिले होते जीवनदान

Siolim Raj Chodankar: केरळ येथून गोव्यात आलेल्या दोन पर्यटकांचा जीव वाचवल्या प्रकरणी गोवा सरकारकडून राज रामा चोडणकर याला मुख्यमंत्री शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे

Akshata Chhatre

Siolim News: गोव्यात पर्यटनाच्या आकर्षणाने अनेक पर्यटक येत असतात, मात्र काही कारणांमुळे अनेकवेळा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. एप्रिल महिन्यात कोट्टायम, केरळ येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा जीव वाचवल्या प्रकरणी गोवा सरकारकडून राज रामा चोडणकर याला मुख्यमंत्री शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामध्ये त्याला १ लाख रुपयांचा इनाम बहाल केला जाईल.

राज चोडणकर हा एक मच्छिमारी आहे आणि रात्रीच्यावेळी मासे पकडत असताना त्याला अचानक शापोरा समुद्रात दोन मनुष्य बुडताना आढळले. ९ एप्रिल २०२३ ची घटना असून राज याने त्या पर्यटकांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले होते. होडीतील जीवरक्षक जॅकेट आणि दोरीच्या साहाय्याने आपण पर्यटकांचा जीव वाचवला असल्याची माहिती राज चोडणकर याने गोव्यातील एका वृत्तवाहिनीला दिली होती.

त्याच्या या कार्याची सरकारने दखल घेतली याबद्दल त्याने सरकारचे आभार मानले आहेत, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हा पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल त्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार डिलायला लोबो यांचे आभार मानले आहेत. आत्तापर्यंत शिवोलीत हा पुरस्कार इतर कोणालाही मिळालेला नाही अशी माहिती त्याने माध्यमांना दिली.

राज चोडणकर याने दाखवलेल्या शौर्याबद्दल त्याचे राज्यभरातून कौतुक केले जात आहे, तसेच लोकं त्याचे भरभरून अभिनंदन करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IRCTC Goa Tour Package: बजेटमध्ये गोवा टूर! आयआरसीटीसी घेऊन आलंय जबरदस्त पॅकेज; 3 रात्री 4 दिवसांच्या सैरसाठी लगेच बुकिंग करा

Montha Cyclone Latest Update: 'मोन्था' चक्रीवादळानं धारण केलं रौद्र रुप, आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार, ताशी 110 किमी वेगाने वाहणार वारे; रेड अलर्ट जारी

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात जाताय? बसेल हजारोंचा दंड, गाडी चालवताना 'हे' नियम हवे तोंडपाठ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

SCROLL FOR NEXT