Goa Tourist Death: 'आम्ही पॅरासेलिंग करून बोटीवर आलो, जेवलो, काही क्षणांतच...', गोव्यात काय घडले महिलेने घटनाक्रमच सांगितला

Baina Beach Bengaluru Tourist Death during Water Sports: मूळचे आंध्र प्रदेशचे मात्र सध्या बंगळुरूत राहणारे संजय श्रीनिवास हे पत्नी आणि एक वर्षांच्या मुलीसह गोव्यात पर्यटनासाठी आले होते.
Goa Bengaluru Tourist Death, Baina Beach
Goa Bengaluru Tourist Death On Baina BeachDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Bengaluru Tourist Death On Baina Beach

वास्को : बंगळुरूत राहणारे कुटुंब.. दिवाळीच्या सुट्टीत फिरण्यासाठी गोव्यात आले.. कुटुंबासोबत आनंदाचे काही क्षण घालवता यावे हा हेतू...पण नियतीने या कुटुंबाच्या पदरी दिलं ते दु:ख. हा दु:खाचा डोंगर कोसळलाय बंगळुरूतील श्रीनिवास कुटुंबावर. एक वर्षांची चिमुरडी वडिलांना हाक मारत होती... पतीसोबत नेमकं काय घडलं हे माध्यमांना सांगणाऱ्या त्या महिलेला आत रुग्णालयात पतीचा मृत्यू झाल्याचे माहिती देखील नव्हते. पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच त्या महिलेने हंबरडा फोडला आणि हे चित्र बघून रुग्णालयातील सर्वांचेच डोळे पाणावले.

Goa Bengaluru Tourist Death, Baina Beach
Goa Tourist Death: बंगळुरुतील पर्यटकाचा गोव्यात बोटीवर मृत्यू; संशयाची सुई जलक्रीडेकडे?

मूळचे आंध्र प्रदेशचे मात्र सध्या बंगळुरूत राहणारे संजय श्रीनिवास हे पत्नी आणि एक वर्षांच्या मुलीसह गोव्यात पर्यटनासाठी आले होते. एका एजंटने त्यांना उत्तर गोव्यातून दक्षिण गोव्यातील नेरुळ समुद्रकिनारी बोटीने आणले.

रविवारी दिवसभरात पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग आणि जलक्रीडेतील अन्य साहसी राईड्स असा भरगच्च कार्यक्रम होता. रविवारी नेमके काय घडले हे संजय यांच्या पत्नीने माध्यमांना सांगितले.

‘जेवणानंतर एका मिनिटांत...’

‘आम्ही उत्तर गोव्यातील एका रिसोर्टमध्ये उतरलो होतो. सकाळी आठ वाजता आम्ही रिसोर्टमधून निघालो. यानंतर बोटीने एका बेटावर गेलो. तिथे पॅरासिलींग केले. पॅरासिलींगनंतर आम्ही बोटीतच जेवलो’ असे त्या महिलेने सांगितले.

जेवणाच्या काही मिनिटांनंतर संजय श्रीनिवास यांना अस्वस्थ वाटू लागले. बोटीवरील अन्य पर्यटकांमध्ये एका वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश होता. त्याने तातडीने श्रीनिवास यांना सीपीआर दिले. यानंतर आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो आणि रुग्णवाहिकेतून जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, अशी माहितीही त्यांनी दिली. माध्यमांना माहिती देत असताना त्यांची एक वर्षांची चिमुरडी बाजूलाच खेळत होती आणि अधून मधून ती वडिलांनाही हाक मारत होती.

Goa Bengaluru Tourist Death, Baina Beach
Goa Tourism: पर्यटकांनो, कर्णकर्कश संगीत आणि दारूच्या नशेत बुडणारे राज्य म्हणजे गोवा नाही

‘स्कुबा डायव्हिंगसाठी जाताना पर्यटक भोवळ येऊन कोसळला’

‘बोटीवर जेवण पोहोचवण्यासाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याने स्थानिकांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मी जेवण दिल्यानंतर बोटीच्या डेकवर थांबलो होतो. स्कुबा डायव्हिंगसाठी आम्ही जात होतो. यादरम्यान पर्यटक जिथे होते तिथून आवाज आल्याने मी खाली पळत गेलो. एक जण भोवळ येऊन कोसळला होता, आम्ही त्याला तातडीने किनाऱ्यावर आणले’ असे त्या कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, पॅरासिलिंग, स्कुबा डायव्हिंगसाठी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना होत्या, याचे ठोस उत्तर त्याला देता आले नाही.

जलक्रीडा आणि सुरक्षा

गोव्यातील किनाऱ्यांवर जलक्रीडा आणि साहसी खेळांचे आयोजन करणाऱ्या एजंट्सनी धुमाकूळ घातला आहे. पर्यटकांकडून भरघोस पैसे घेतले जातात, पण त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. बायणा समुद्रकिनारी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत्यू कशामुळे झाला, यात जलक्रीडेसाठी नेणाऱ्या कंपनीचा दोष होता का हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com