CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी सरकार कठीबद्ध

राज्यात आत्मनिर्भर भारत अंतर्गत 56 योजना सुरु

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सार्वजनिक सहाय्य विभागामार्फत एक योजना जाहीर केली. यावेळी गोवा सरकारला केवळ पायाभूत सुविधांचा विकास करायचा नाही. तर हे सरकार लोकांच्या सर्वांगिण कल्याणासाठीही कठीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.

(CM Pramod Sawant Govt to renovate homes run by Provedoria department )

“केवळ पायाभूत सुविधा निर्माण करणे नाही, तर मानवी विकासात सुधारणा करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्हाला केंद्राकडून विकासकामांसाठी सुमारे `2,000 कोटी आधीच मिळाले आहेत, जे आम्ही मोपा विमानतळ, वेस्टर्न बायपास आणि इतर कामांसाठी वापरत आहोत.

तसेच, आपल्या स्वयंपूर्णतेसाठी वापरणार आहोत. आत्मनिर्भर भारत अंतर्गत,आम्ही 88 पैकी 56 योजना सुरु केल्या आहेत. मी पंच सदस्यांनाही यावर काम करण्याचे आवाहन करतो,” ते म्हणाले मंत्री सुभाष शिरोडकर, ही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी बोलताना सार्वजनिक सहाय्य विभाग सचिव सुभाष चंद्र म्हणाले की, मनोरुग्णालयांवर जास्त भार आहे. आणि ज्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यांना त्यांच्या बरे झाल्यानंतर समायोजित करण्यासाठी जागा आवश्यक आहे. अशा वेळी अर्धवट घरे कामी येतात. घरगुती काळजी तसेच पौष्टिक आहार देण्यासाठी अशी घरे महत्वाची असल्याचं ते म्हणाले.

सार्वजनिक सहाय्य विभाग संचालिका उपासना माजगावकर म्हणाल्या की, अनेकदा मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती बरे झाल्यानंतर अशा व्यक्तींकडे त्यांचे कुटुंबीय परत दुर्लक्ष करतात. त्यामूळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून हलवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सध्या 39 महिला रुग्णांना उत्तर गोवा जिल्ह्यातील म्हापसा येथील घरात ठेवण्यात आले आहे, तर दक्षिण गोव्यातील माजोर्डामध्ये 19 पुरुष रुग्ण राहतात. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT