CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

'CM Pramod Sawant प्रति बांदोडकर, ब्रँड गोव्याचा प्रश्न येतो तेव्हा...'; आमदार व्हिएगस यांच्याकडून स्तुतीसुमनांचा वर्षाव

Brand Goa and CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे प्रति भाऊसाहेब बांदोडकर आहेत. भाऊसाहेबांनी विकासकामे करतांना सत्ताधारी आणि विरोधी असा भेदभाव केला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे प्रति भाऊसाहेब बांदोडकर आहेत. भाऊसाहेबांनी विकासकामे करतांना सत्ताधारी आणि विरोधी असा भेदभाव केला नाही. आता प्रमोद सावंत हेही तसेच वागतात. ‘ब्रँड गोवा’चा प्रश्न येतो, तेव्हा मुख्यमंत्री सावंत विरोधी मतदारसंघातही विकासासाठी तप्तर असतात, अशा शब्दांत बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या हस्ते कोलवा येथील सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पाचे उद्‍घाटन कऱण्यात आले. त्यावेळी विएगस यांनी त्यांची स्तुती केली. यावेळी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा हेही उपस्थित होते. गोव्याच्या आजच्या अस्मिताय दिना दिवशी बाणावलीत  होली ट्रिनिटी उच्च माध्यमिक शाळा इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाचाही शुभारंभ स्थानिक आमदार वेन्झी व्हिएगस यांच्या हस्ते करण्यात आला.

आस्मिता दिनाचे औचित्य साधून बोलताना व्हिएगश म्हणाले, गोव्याचे (Goa) पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर व विरोधीपक्ष नेते डॉ. जॅक सिक्वेरा हे जरी एकमेकांना विरोधी असले तरी बांदोडकर यांनी विरोधी आमदाराच्या मतदारसंघातील विकास मागे पडू दिली नाहीत. सासष्टीत  बांदोडकर यांना जमनत  कौलात विरोध झाला होता. पण तरीही नंतर त्यांनी सासष्टीत  अनेक प्राथमिक शाळा सुरू केल्या असे व्हिएगस यांनी सांगितले.

आपल्याला सासष्टीने कमी मते दिली म्हणून त्यांनी या तालुक्यावर राग काढला नाही. आज मुख्यमंत्री सावंत हेही तसेच करतात. आपण गेली तीन वर्षे विरोधी पक्षात आहे. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून वावरत आहेत. जेव्हा जेव्हा ‘ब्रॅंड गोवा’चा, शैक्षणिक किंवा इतर विकास कामांचा प्रश्न येतो, तेव्हा विरोधी किंवा सरकार पक्षातील असा भेदभाव न करता सर्व कामे मंजूर करतात असेही वेन्झी व्हिएगस यांनी सांगितले. 

होली ट्रिनिटी उच्च माध्यमिक शाळेची दुरुस्ती आमदार निधीतून केली जात आहे व त्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे, असेही व्हिएगस यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या सरकारकडून कसलाही भेदभाव केला जात नाही, असे सांगून ज्या ठिकाणी विकासाची गरज आहे, तिथे आम्ही जरूर विकासकामे करू.

...तर पाणी जोडणी तोडू!

बाणावली मतदारसंघातील सांडपाण्याची समस्या सुटावी यासाठी ३३ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प बांधला गेला आहे. एकूण सांडपाणी व्यवस्थापनावर ५५ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याचा उपयोग लोकांनी करावा. या प्रकल्पाची जोडणी लोकांनी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले. जे कोण ही जोडणी घेणार नाहीत त्यांचे पाण्याचे नळ कनेक्शन कापले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT