CM Pramod Sawant: खुशखबर! गोव्यात मिळणार 150 ठिकाणी मोफत ‘वायफाय’ सुविधा

Goa Free Public WiFi Hotspot: गोवा सरकारने डिजिटल सुविधा वाढवण्यासाठी वाय-फाय प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत गोव्यातील १५० ठिकाणांवर वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantX
Published on
Updated on

Goa free Internet Wi-Fi Hotspot

पणजी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गोवा डिजिटल क्रांतीच्या दिशेने पुढे जात आहे. ‘विरासत भी और विकास भी’ या तत्त्वावर आधारित राज्य सरकारने एक महत्त्वाकांक्षी वायफाय प्रकल्प सुरू केला आहे. ज्या ठिकाणी यापूर्वी इंटरनेट आणि वायफाय सुविधा उपलब्ध नव्हती, त्या ठिकाणी आता मोफत वायफाय सेवा मिळणार आहे. याचा फायदा गोमंतकीयांना होईल, अशी आशा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

गोवा सरकारने डिजिटल सुविधा वाढवण्यासाठी वाय-फाय प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत गोव्यातील १५० ठिकाणांवर वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे. सध्या पहिल्या टप्प्यात ७५ ठिकाणे निवडली असून या ठिकाणी २-३ इनडोअर आणि आउटडोअर वाय-फाय अ‍ॅक्सेस पॉईंट्स कार्यरत करण्यात आले आहेत. निवडलेली ७५ ठिकाणे संबंधित मतदारसंघातील आमदारांच्या शिफारशीनुसार ठरवण्यात आली आहेत.

माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभाग व पर्यटन विभागातर्फे फ्री पब्लिक वायफाय हॉटस्पॉट, ४ जी बीएसएनएल टॉवर, लेट्सगोवा आणि वन मॅप गोवा जीआयएस या चार महत्त्वाच्या प्रकल्पांचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. गोव्यात डिजिटल कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल आणि तांत्रिक प्रगतीसह पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल या उद्देशाने या चारही सेवा देण्यात आल्या.

गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुनील अंचीपाका, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभाग संचालक मिलिंद सखरदांडे, उपसंचालक आकाश कंटक, मुख्य सचिव व्ही कँडेवेलू उपस्थित होते.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, डिजिटल माध्यमातून आम्ही पर्यटनात बदल आणत आहोत. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करत असून डिसेंबरपूर्वी त्या सुविधा मिळाव्यात म्हणून आम्ही मोफत सेवा सुरू केली आहे.

CM Pramod Sawant
Goa Liberation Day: घरात घुसलेल्या पोर्तुगीज अधिकाऱ्याला खडसावून सांगणारी १५ वर्षांची मुलगी; वाचा शारदा सावईकरांचा लढा

डिजिटल पायाभूत सुविधा

गोव्याच्या डिजिटल विकासासाठी सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून वायफाय अ‍ॅक्सेस पॉईंट्सची स्थापना केली आहे. या सुविधांमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सहजगत्या इंटरनेट सेवा मिळेल. राज्यातील तांत्रिक सुविधा अधिक सक्षम करून गोव्याने ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाच्या उद्दिष्टांप्रति एक मोठे पाऊल उचलले आहे. या क्रांतीमुळे डिजिटल गोव्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

CM Pramod Sawant
Porvorim: दहा दिवसांत डांबरीकरण, माहिती फलक उभारणी; 'पर्वरी' प्रकरणात कंत्राटदाराची न्‍यायालयात हमी

वायफायचे वैशिष्ट्य

इनडोअर कव्हरेज: ३० मीटर

आउटडोअर कव्हरेज: ५० मीटर

गती: ३० एमबीपीएस इंटरनेट गती वापरकर्त्यांसाठी सुनिश्चित केली आहे.

कॅप्टिव्ह पोर्टल: वापरकर्त्यांना सुरक्षित लॉगिन प्रदान केले जाणार.

ओटीपी नोंदणी: ओटीपीच्या माध्यमातून नोंदणी करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com