Chief Minister Pramod Sawant on Sunburn Festival

 
Dainik Gomantak
गोवा

'...म्हणून सनबर्नला गोव्यात बंदी नाही'

मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचं पहिल्यांदाच सनबर्न फेस्टिव्हलवर भाष्य

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु असतानाच कोरोना रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे गोव्यात कडक निर्बंध लादण्याची मागणीही अनेकांनी लावून धरली आहे. यातच गोव्यात सुरु असलेला सनबर्न फेस्टिव्हलही (Sunburn Festival) बंद करण्याची मागणी होत आहे. मात्र सनबर्न फेस्टिव्हलला बंदी घालता येणार नसल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.

एखाद्या ठराविक जागेत सर्व नियमांचं पालन करुन सनबर्न फेस्टिव्हल (Sunburn Festival) होत असेल तर त्यावर बंदी घालता येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सनबर्नला सरकारने कोणतीही परवानगी दिली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान गोव्यात तूर्तास कोणताही नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू करणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. मात्र 3 जानेवारी रोजी टास्क फोर्सची (Task Force) बैठक आयोजित करण्यात आली आहे, त्यात निर्बंध घालायचे की नाही यावर निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गोव्यात न्यू ईअर पार्ट्यांना परवानगी

गोव्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. या पार्ट्यांमध्ये नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असते. या पार्ट्यांच्या आयोजनावर सरकारने निर्बंध (Restrictions) आणलेले नसून पार्टीत सहभागी होणाऱ्यांसाठी मात्र काही अटी घालण्यात आल्या आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या किंवा कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असल्यासच पार्टीत प्रवेश दिला जाणार आहे.

लीज बाहेरील खनिज डंपचा लिलाव करणार

खनिज डंप लिलाव करण्याच्या धोरणाला गोवा मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे 10 दशलक्ष टन खनिज डंपची (Mining) निर्यात शक्य होणार आहे. लीज बाहेरील डंपचा लिलाव करणार असल्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT