‘झुआरी’ पुलावर वाहतूक कोंडी

दोन्ही बाजूला सकाळ-संध्याकाळी मोठ्या रांगा
Zuari Bridge

Zuari Bridge

Dainik Gomantak

वास्को : नाताळ सण आणि मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांचा ओघ गोव्यात वाढत असून रहदारीचा ताण वाढला आहे. कुठ्ठाळी झुआरी पुलावर वाहतूक रहदारीमुळे चक्का जाम होत असल्याने वाहतूक पोलिसांबरोबर लोकांची डोके दुखी वाढली आहे. कुठ्ठाळी येथील दुसऱ्या झुआरी पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

<div class="paragraphs"><p>Zuari Bridge</p></div>
Business Rivalry: कळंगुटमध्ये व्यावसायिक वादातून जीवघेणा हल्ला

गेल्या आठवड्यापासून वाहतुकीच्या कोंडीचे प्रमाण बरेच वाढले असून वाहने रांगेत उभी करून ठेवावी लागत आहेत. यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. कुठ्ठाळी भागात झुआरी पुलाचे (Zuari Bridge) काम सुरू असल्यामुळे सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी होते. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी होते.

नंतर संध्याकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होते. यामुळे कुठ्ठाळीतील झुआरी पुलापासून पणजीच्या (Panaji) दिशेने आगशी ते गोवा वेल्हापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात तर मडगावच्या दिशेने जाताना कुठ्ठाळीच्या पुलापासून ठाणे-कुठ्ठाळी ते वेर्णा औद्योगिक वसाहतीपर्यंत वाहनांच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागलेल्या असतात. मडगावहून कुठ्ठाळीमार्गे पणजीला येणे, ही लोकांना डोकेदुखी ठरते.

<div class="paragraphs"><p>Zuari Bridge</p></div>
कोकण रेल्‍वेचे ‍विद्युतीकरण मार्च महिन्‍यापर्यंत पूर्णत्वास

धूळ प्रदूषणाचाही वाहन चालकांना जास्त त्रास होतो. या मार्गावर बरेच वाहन चालक पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे वाहनांच्या दुप्पट रांगा लागत असतात. यामुळे वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) होऊन सर्वांना डोकेदुखी ठरते.

कुठ्ठाळीत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस (Traffic Jam) तैनात असले, तरी वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमुळे पोलिसांना वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगारांची गर्दी या वाहतुकीच्या कोंडीचे अन्य एक कारण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com