गोव्यात भाजपने डान्सबार संस्कृती आणली : लोलयेकर

कायदा व सुव्यवस्था ढासळली असतानाही केंद्र सरकारने गोव्याला (Goa) ‘गुड गव्हर्नन्स’मध्ये स्थान दिल्याचे पाहून आश्‍चर्य वाटते.
Mohandas Lolayekar

Mohandas Lolayekar

Dainik Gomantak 

Published on
Updated on

मडगाव : कायदा व सुव्यवस्था ढासळली असतानाही केंद्र सरकारने गोव्याला ‘गुड गव्हर्नन्स’मध्ये स्थान दिल्याचे पाहून आश्‍चर्य वाटते, असे मत गोवा फॉरवर्ड पार्टीचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर (Mohandas Lolayekar) यांनी बुधवारी व्यक्त केले.

लोलयेकर यांनी बुधवारी मडगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भाजपची (BJP) दुहेरी इंजिने एकमेकांना शाबासकी देत आहेत. “गृहमंत्रालयाची यंत्रणा गोव्याच्या कारभाराचे मूल्यांकन करण्यात अपयशी ठरली आहे. कळंगुटमध्ये पिस्तुलांचा वापर करून टोळीयुद्ध सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने (Central Government) दिलेल्या गुड गव्हर्नन्स रँकचा पर्दाफाश झाला आहे.” असे लोलयेकर म्हणाले. भाजप सरकार (BJP government) अवैध मार्गाने पैसे उकळण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. गोव्यात डान्सबार संस्कृती रुजत आहे. मात्र अशा घटनांवर कोणतीही कारवाई होत नाही असेही ते म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Mohandas Lolayekar</p></div>
...त्यामुळे राज्यात नोकऱ्या फक्त पेडणे तालुक्यात मिळणार: उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

दहा वर्षांपूर्वी गोव्यात शांतता होती, पण भाजपच्या राजवटीने ती बिघडवली आहे. गोव्याची सामाजिक बांधणी उद्ध्वस्त झाली आहे, असे ते म्हणाले. लोलयेकर म्हणाले की कोविड सर्वत्र पसरत आहे, रीही सरकार कोणतीही कारवाई करत नाही. “कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक लोकांचा मृत्यू झाला. आता सरकारने उपाययोजना करावी.’’ असे लोलयेकर म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यातील जनतेने भाजप सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com