लीज बाहेरील खनिज डंपचा लिलाव करणार : मुख्यमंत्री

खनिज डंप लिलाव करण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता
Chief Minister Pramod Sawant on Mining Dump

Chief Minister Pramod Sawant on Mining Dump

Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी : खनिज डंप लिलाव (Mining Dump) करण्याच्या धोरणाला गोवा मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे 10 दशलक्ष टन खनिज डंपची निर्यात शक्य होणार आहे. लीज बाहेरील डंपचा लिलाव करणार असल्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी बुधवारी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. लीज बाहेरील डंपचा लवकरच लिलाव करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत (Press Conference) केली आहे.

लॉकडाऊनमुळे (Lockdown) आर्थिक संकटात सापडलेल्या गोव्याच्या अर्थव्यवस्थेला या निर्णयामुळे काहीसा हातभार लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या नाईट कर्फ्यू लावणार नसल्याचीही घोषणा केली.

मात्र न्यू ईअर पार्टीमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पार्टी सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांची (Police) करडी नजर असेल, तसेच कोणीही नियम तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तूर्तास गोव्यात नाईट कर्फ्यूचा विचार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com