Chief Election Commissioner Dainik Gomantak
गोवा

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

Chief Election Commissioner Goa visit: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची पूर्वतयारी आणि यंत्रणेची सज्जता तपासण्यासाठी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार २ व ३ सप्टेंबर रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची पूर्वतयारी आणि यंत्रणेची सज्जता तपासण्यासाठी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार २ व ३ सप्टेंबर रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत.

या दौऱ्यात ते निवडणूक प्रक्रियेशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन करणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत महासंचालक (माध्यम) आशिष गोयल, महासंचालक (माहिती तंत्रज्ञान)

सीमा खन्ना यांच्यासह निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकारी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील निवडणूक यंत्रणेची तयारी, मतदार यादी, मतदान केंद्रांची व्यवस्था तसेच मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेबाबतची कार्यवाही यांचा या दौऱ्यात आढावा घेतला जाणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी मडगाव येथील रवींद्र भवनात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी राज्यातील सुमारे १,५०० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क असलेल्या या अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी राज्यातील ४० विधानसभा मतदारसंघांतील साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठकही मडगाव येथील रवींद्र भवनात होणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून निवडणूक प्रक्रियेतील अडचणी, तयारी आणि आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतलाजाणार आहे.

प्रश्नोत्तरातून शंकांचे निरसन

मतदार यादी, अद्ययावतीकरण, मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन व दृक्‌श्राव्य प्रशिक्षण दिले जाईल. संभाव्य परिस्थिती हाताळणीसह प्रश्नोत्तरातून शंकांचे निरसन केले जाईल.

विद्यालयांमध्ये निवडणूक जागृतीचे क्लब

विद्यालयांमध्ये निवडणूक जागृतीसाठी सध्या १५० क्लब कार्यरत असून आणखी २० क्लब सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार, प्रक्रिया, पारदर्शकता व जबाबदार मतदानाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT