Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

Son Appeal Rejected: वडिलांनी बहिणीच्या नावे केलेल्या मृत्युपत्राला आव्हान देत दाखल केलेले कायतान डेस्मंड काजेदी पिरीस याचे अपील दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले.
Son Appeal Rejected
Son Appeal RejectedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: वडिलांनी बहिणीच्या नावे केलेल्या मृत्युपत्राला आव्हान देत दाखल केलेले कायतान डेस्मंड काजेदी पिरीस याचे अपील दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. मृत्युपत्राद्वारे वडिलांनी केवळ आपल्या कायदेशीर विल्हेवाटीच्या हिश्शाची तरतूद केली असल्याचे स्पष्ट केले.

वार्का येथील कायतानने बहीण सेविश्रा पिरीस यांच्याविरोधात हे अपील दाखल केले होते. आईच्या निधनानंतर कायतानने २०१६ मध्ये मालमत्तेच्या नोंदणी व वाटपाची प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. तत्पूर्वी, ५ ऑक्टोबर २०१५ रोजी वडिलांनी केलेल्या जाहीर मृत्युपत्रात मालमत्तेतील स्वत:चा हिस्सा मुलगी सेविश्रा यांच्या नावे केला होता.

Son Appeal Rejected
Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

मात्र, या मृत्युपत्राला आक्षेप घेत कायतानने मालमत्तेचे अद्याप अधिकृत वाटप झालेले नसताना सहहिस्सेदार म्हणून त्यांच्या संमतीशिवाय वडिलांना मालमत्तेबाबत अशी तरतूद करता येणार नाही, असा दावा केला होता. कनिष्ठ न्यायालयाने हा आक्षेप फेटाळल्यानंतर त्याने जिल्हा न्यायालयात अपील केले.

मात्र, जिल्हा न्यायालयाने मृत्युपत्राची पाहणी केल्यानंतर त्यात कोणतीही विशिष्ट किंवा संपूर्ण मालमत्ता बहिणीच्या नावे केल्याचे आढळले नाही. वडिलांनी कायद्याने अनुमत असलेल्या स्वतःच्या विल्हेवाटीच्या हिश्शाचीच तरतूद केली होती, असे न्यायालयाने नमूद केले.

Son Appeal Rejected
Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

मृत्युपत्राचा लावला चुकीचा अर्थ

गोवा उत्तराधिकार, विशेष नोटरी व इन्व्हेंटरी कार्यवाही कायदा, २०१२ मधील कलम २२७ व ८३ नुसार व्यक्तीला आपल्या मालमत्तेतील कायदेशीर मर्यादेतील विल्हेवाटीच्या हिश्श्याबाबत मृत्यूपत्र करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, एखादा दस्तावेज पूर्णपणे शून्य किंवा रद्दबातल घोषित करण्याचा अधिकार नियमित दिवाणी न्यायालयाला असून, इन्व्हेंटरी न्यायालयाला अशा स्वरूपाचा व्यापक अधिकार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. अपीलकर्त्याने मृत्युपत्राचा चुकीचा अर्थ लावल्याचेही न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने अपिलासह संबंधित अर्जही फेटाळून लावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com