Goa Sport: FC गोवाला 'क' गटात स्थान; AFC चॅलेंज लीग मोहीम 17 ऑक्टोबरपासून कुवेतमध्ये

FC Goa AFC Challenge League: एफसी गोवा संघ १७ ऑक्टोबरपासून एफसी चॅलेंज लीग फुटबॉल स्पर्धेत खेळेल. या स्पर्धेसाठी त्यांचा ‘क’ गटात समावेश करण्यात आला असून सामने कुवेतमध्ये खेळले जातील.
FC Goa AFC Challenge League
Goa SportDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एफसी गोवा संघ १७ ऑक्टोबरपासून एफसी चॅलेंज लीग फुटबॉल स्पर्धेत खेळेल. या स्पर्धेसाठी त्यांचा ‘क’ गटात समावेश करण्यात आला असून सामने कुवेतमध्ये खेळले जातील.

मलेशियातील क्वालालंपूर येथे गुरुवारी सोडतीद्वारे संघांची गटनिश्चिती करण्यात आली. एफसी गोवाच्या क गटात कुवेतमधील कादसिया स्पोर्टस क्लब, बांगलादेशमधील फोर्टिस एफसी व ताजिकिस्तानमधील एफसी रेगर-तादएझ हे संघ आहेत.

FC Goa AFC Challenge League
Mumbai Goa Highway: कोकणवासियांच्या खिशाला फटका! मुंबई-गोवा महामार्गावरील 'या' टोलनाक्यावर दरवाढ; वाहनचालकांना भरावे लागणार 'इतके' पैसे

एफसी गोवाच्या गटातील कादसिया एससी आणि फोर्टिस एफसी यांनी अनुक्रमे २०२५-२६ कुवेत प्रीमियर लीग आणि बांगलादेश फुटबॉल लीगमध्ये तिसरे स्थान मिळविले आहे. तर एफसी रेगर-तादएझ हा २०२५ मधील ताजिकिस्तान कप विजेता संघ आहे. गटसाखळी सामने १७ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत एकाच ठिकाणी, एकेरी साखळी पद्धतीने खेळविले जातील. ‘क’ गटातील सर्व सामने कुवेतमध्ये होणार असून, कादसिया एससी या सामन्यांचे यजमानपद भूषवेल.

तिसऱ्यांदा आशियाई क्लब स्पर्धेत

२०२५-२६ मोसमात एआयएफएफ सुपर कपचे विजेतेपद मिळवल्यामुळे एफसी गोवाने इतिहासात तिसऱ्यांदा आशियाई (एएफसी) क्लब स्पर्धेत स्थान मिळविले. गेल्या बुधवारी (ता. १२ ऑगस्ट) एएफसी चॅम्पियन्स लीग-२ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एफसी गोवाला एफके अर्कदागकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला होता.

FC Goa AFC Challenge League
Congress Goa Forward Alliance: युतीवरून काँग्रेसमध्येच मतभेद? गिरीश म्हणाले, ‘ते पुढे आल्यास आम्हीही तयार’, युरींचा सावध पवित्रा

त्यामुळे एफसी गोवाची एएफसी चॅलेंज लीगच्या गटसाखळीत वर्णी लागली. ही आशियातील पुरुषांच्या क्लब फुटबॉलमधील तिसऱ्या क्रमांकाची स्पर्धा आहे. २०२५-२६ मध्ये प्ले-ऑफ सामना जिंकून एफसी गोवाने एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेच्या गटसाखळीसाठी पात्रता मिळविली होती, तर २०१९-२० मध्ये आयएसएल शिल्ड पटकावल्यामुळे एफसी गोवा संघ २०२१ मध्ये एएफसी चँपियन्स लीग एलिट स्पर्धेच्या गटसाखळीत खेळणारा पहिला भारतीय क्लब ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com