

October 2026 Planetary Transits Astrology: अक्टोबर महिन्यात आकाशात होणाऱ्या ग्रहांच्या मोठ्या बदलांमुळे आणि गोचर स्थितीमुळे ज्योतिषशास्त्रानुसार अनेक राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत. 3 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह तूळ राशीत वक्री होणार आहे, तर 17 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे अत्यंत शुभ मानला जाणारा ‘शुक्रादित्य योग’ जुळून येईल. यानंतर 24 ऑक्टोबरला बुद्ध वक्री होईल आणि महिन्याच्या शेवटी, म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी देवगुरु बृहस्पती सिंह राशीत गोचर करतील.
या सर्व ग्रहांच्या स्थित्यंतराचा आणि परिवर्तनाचा थेट व अनुकूल प्रभाव मेष ते मीन सर्वच राशींवर पडणार आहे. विशेषतः कर्क, सिंह, वृश्चिक आणि मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना अत्यंत फलदायी, प्रगतीचा आणि भरभराटीचा ठरणार असून त्यांना करिअर-व्यापारात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी अक्टोबर महिना आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असणार आहे. या काळात मोठी कमाई होण्याची शक्यता असून व्यापाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. तसेच नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा वेतनवाढीची खूशखबर मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांची पूर्ण साथ लाभेल, ज्यामुळे मनातील नवीन प्रकल्पांची किंवा कामांची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम आहे.
सिंह राशीच्या जातकांसाठी ग्रहांची ही विशेष युती भाग्याची साथ मिळवून देणारी ठरेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हवी तशी नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असून, हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश आणि मान-सन्मान प्राप्त होईल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना संपत्ती आणि उत्पन्नात (Income) वाढ घेऊन येणार आहे. तुमची नेतृत्व क्षमता या काळात अधिक मजबूत होईल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उत्तम असून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल, परिणामी मन कायम प्रसन्न राहील.
मकर राशीच्या जातकांना मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या आर्थिक अडचणी आणि संकटांपासून मोठा दिलासा मिळेल. कर्जाच्या डोंगरातून सुटका होण्याचे मार्ग मोकळे होतील आणि आर्थिक स्थिती वेगाने सुधारेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल्याने वैयक्तिक आयुष्य अधिक सुखकर होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.