Ranjita Pai Dainik Gomantak
गोवा

Ranjita Pai : पीडित महिलांना न्याय मिळवून देणार; महिला आयोगाच्या अध्यक्ष रंजिता पै

शेकडो तक्रारींचा निपटारा करणार

मंगेश बोरकर

Ranjita Pai : गोवा राज्य महिला आयोगाकडे अनेक पिडीत महिलांच्या तक्रारी आहेत, याची मला जाणीव आहे. या आयोगाचे अध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या पदाला व पिडीत महिलांना योग्य न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असेल, असे गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या रंजिता पै यांनी सांगितले.

राज्‍यात जवळपास दीड वर्ष महिला आयोगाचे अध्‍यक्षपद रिक्‍त होते. 300हून अधिक तक्रारी आयोगाकडे पेंडिंग आहेत. त्‍यांचा निपटारा होऊ शकणार आहे. माझी या पदावर आजच नियुक्ती झाल्याचे कळले.

पदाचा ताबा घेतल्यावर महिलांच्या नेमक्या काय तक्रारी आहेत. त्याची गंभीरता, खरेपणा किती आहे? याचा अभ्यास केल्यावर आपल्याला नेमका निर्णय घेता येईल, असेही पै यांनी सांगितले.

शिवाय पदाचा ताबा घेतल्यावर महिला व बालविकास खात्याच्या संचालक, आरोग्य खात्याच्या संचालक यांच्याकडे चर्चा करून कामाचे स्वरूप ठरविले जाईल, असेही पै यांनी सांगितले. शिवाय आयोगामध्ये अन्य कोण सदस्य आहेत, ते सुद्धा पाहून कामाचे वेळापत्रक ठरविले जाईल.

अनेकांनी केले अभिनंदन!

रंजिता पै यांनी भाजप महिला मोर्चा मडगावच्या अध्यक्ष, मडगाव भाजप मंडळाच्या सरचिटणीस, व 2020 पासून राज्य महिला मोर्चाच्या सरचिटणीस आदी पदी काम पाहिले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबरोबर अनेकांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरुन त्‍यांचे अभिनंदन केले. यात राज्य अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार दिगंबर कामत, शर्मद पै रायतुरकर, मडगावमधील भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

"या पदाला पात्र समजून राज्य सरकारने जी जबाबदारी टाकली आहे. त्यासाठी सरकारचे सर्वप्रथम आभार मानते. पीडित महिलांना न्‍याय देणे, हे माझे कर्तव्‍य समजते."

- रंजित पै, महिला आयोग अध्‍यक्ष

कारकीर्द अशी...

वयाच्या 45 व्या वर्षी मास्टर्स इन पब्लिक सोशल वर्क पूर्ण. संशोधन कार्यामध्ये एम. फार्म पदवी प्राप्‍त. समाजकारणात अनेक वर्षे सक्रिय सहभाग. कारवारमधील महाविद्यालयात प्राचार्य म्‍हणून काही महिने कार्य.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT