Vijay Sardesai : रामनवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा : विजय सरदेसाई

मुख्यमंत्र्यांकडे मागणीनंतर मुख्य सचिवांनाही पत्र
Vijay Sardesai
Vijay Sardesai Dainik Gomantak

Vijay Sardesai : गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रामनवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली.

काही दिवसांपूर्वीच सरदेसाई यांनी गोवा सरकारवर राम नवमीच्या दिवशी सुट्टी घेऊन अधिवेशनाचा एक दिवस कमी केल्यावरून टीका केली होती.

तसेच रामनवमीचा दिवस सुट्टीमुळे कमी केला असला तरी अधिवेशनाचा आणखी एक दिवस वाढवणे शक्य आहे, असेही सरदेसाई म्हटले होते.

Vijay Sardesai
Goa Water Problem : सांतआंद्रेतील पाणीप्रश्‍न 8 दिवसांत सोडवा

आमदार सरदेसाई यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुम्हांला हे चांगले ठाऊक असेल की या वर्षी रामनवमी या महिन्याच्या 30 तारखेला येते आणि ती प्रतिबंधित सुट्टी म्हणून घोषित करण्यात आली आहे.

भगवान रामावर हिंदूंची श्रद्धा आणि भक्ती आहे आणि त्या दिवशी ज्या उत्साहात उत्सव आणि विधी पाळले जातात, ते पाहता मला वाटते की, त्यांच्या जन्मदिवसाला सरकारांनी आदर आणि महत्त्व दिलेले नाही.

ही विसंगती दुरुस्त करण्यासाठी, आम्ही गोवा फॉरवर्डच्यावतीने मागणी करत आहोत की, आमच्या राज्यात रामनवमी म्हणून साजरा केला जाणारा प्रभू रामाचा जन्म दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर करावा.

Vijay Sardesai
Generic Medicine : फार्मसींत आता जेनरिक औषधांचे काऊंटर!

धर्माने जीवन जगले पाहिजे!

सरदेसाई पुढे म्हणाले, भगवान राम हे आदर्श पुरुष आणि न्यायी शासक आहेत. त्यांच्या जीवनाकडे पाहून एखाद्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे, आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत आणि धर्माने जीवन जगले पाहिजे. हाच रामाच्या जीवनातील प्रतिकात्मक संदेश आहे.

रामराज्याचे अनुकरण करा

रामराज्यात समानता, निष्पक्षता आणि न्याय ही तत्त्वे होती. ते आजच्या राज्यकर्त्यांनी कायम राखावे आणि त्यांचे अनुकरण करावे अशी लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळे मला वाटते की रामनवमीचा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करणे आनंददायी आणि योग्य ठरेल, असे सरदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com