Young Inspirators Network  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे करियर मार्गदर्शन कार्यक्रम

गोमन्‍तक आणि सकाळ माध्यम समूहाचा उपक्रम

दैनिक गोमन्तक

मडगाव: ‘गोमन्‍तक’ आणि सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे दि. 22, 23 आणि 24 मार्च असे तीन दिवस राज्‍यातील विविध महाविद्यालयांमध्ये करियर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील सकाळ मीडिया ग्रुप आणि एपी ग्लोबले संस्थेच्या प्रशिक्षण आणि कौशल्य विकास (स्किलिंग) विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, करियर ट्रेनर आणि शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक निनाद पानसे (पुणे) हे गोव्यात येणार आहेत. त्यांच्या 30 वर्षांहूनही अधिक काळाच्‍या प्रदीर्घ अनुभवातून ते विद्यार्थ्यांना भविष्यातील नोकरी, व्यवसायातील संधी आणि त्यासाठीची तयारी याबाबत मार्गदर्शन करतील.

उद्या मंगळवार दि. 22 रोजी काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय, बुधवार दि. 23 रोजी म्हापसा येथील ज्ञानप्रसारक मंडळ कॉलेज आणि रीसर्च सेंटर व धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय तर गुरुवार दि. 24 रोजी फर्मागुडी येथील गोवा विद्याप्रसारक मंडळाचे गोपाळ गोविंद पै रायतुरकर वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, फोंडा एज्युकेशन सोसायटीच्या रवी नाईक कला आणि विज्ञान महाविद्यालयात कार्यक्रम होणार आहे.

गोवा राज्य झपाट्याने बदलत आहे. त्यात रोजगाराच्या तसेच नवनवीन स्टार्टअपच्या असंख्य संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य वयात योग्य दिशा देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना संबंधित कॉलेजमधील अधिकाधिक मुलांनी उपस्थित रहावे असे आवाहन यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Rekha Gupta Attacked: दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला, जनता दरबार सुरु असताना घडला प्रकार; आरोपी ताब्यात

महिनाभरात बैलांना मायक्रोचीप बसवा, अन्‍यथा 50 हजार दंड; धीरयो रोखण्‍यासाठी मालकांना 'वेसण'

Goa Politics: 'बाप्‍पा' पावला... तवडकर, कामतांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ; 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Rashi Bhavishya 21 August 2025: निर्णय घेताना सावध राहा,आर्थिक लाभाची शक्यता; महत्वाची कामे पूर्ण होतील

गोवा काँग्रेसने काळे झेंडे दाखवले, निषेध केला; त्याच सुदर्शन रेड्डींना इंडिया आघाडीने दिली उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी

SCROLL FOR NEXT