बांदोड्याचा चित्ररथ ठरला अव्‍वल

दुर्गाभाट येथील साई कला मंडळाला द्वितीय तर आखाडा येथील ब्रह्मेश्वर युवक संघाला तृतीय बक्षीस मिळाले.
 Shigmotsav
Shigmotsav Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्हापसा शिगमोत्सव मंडळ व गोवा सरकारचे पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने म्हापसा पालिकेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या शिगमोत्सवातील चित्ररथ मिरवणुकीचे प्रथम पारितोषिक बांदोडा येथील महालक्ष्मी नागरिक समितीला प्राप्‍त झाले. दुर्गाभाट येथील साई कला मंडळाला द्वितीय तर आखाडा येथील ब्रह्मेश्वर युवक संघाला तृतीय बक्षीस मिळाले.

चित्ररथ स्पर्धेतील अन्य बक्षिसांचे मानकरी पुढीलप्रमाणे: चौथे: उंडिर-बांदोडा (गणेश-गजासुर युद्ध), पाचवे: सिद्धेश्वर कला मंडळ बस्तोडा, सहावे: दाडेश्वर स्पेर्टस क्लब नेरूल, सातवे: महादेव बॉईज देवतेवाडा-कुडचडे, आठवे: बालगोपळ कला चिंबल, नववे: गजानन कला मंडळ कपिलेश्वरी, दहावे: महालक्ष्मी क्रिएशन काकोडा, अकरावे: सातेरी युवक संघ मेरशी, बारावे : सरस्वती यूथ क्लब फोंडा, तेरावे : रायेश्वर युवक मंडळ, चौदावे : मुरलीधर युवक संघ कळंगुट, पंधरावे: हणजूण संघ.

 Shigmotsav
ढवळीत डाऊन सिंड्रोम दिवस उत्साहात

रोमटामेळ स्‍पर्धेत सुयोग शिगमोत्सव मंडळाला पहिल्‍या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. दुसरे: सावर्डे शिगमोत्सव मंडळ, तिसरे: बार्देश शिमगोत्सव मंडळ, चौथे: स्वरसाई शिगमोत्सव मंडळ, पाचवे: पाईकदेव शिगमोत्सव समिती, सहावे: कुडचडे-काकोडा शिमगोत्सव समिती, सातवे: डोंगरी शिमगोत्सव मंडळ, आठवे: श्री शांतादुर्गा शिगमोत्सव मंडळ.

लोकनृत्य स्पर्धेत सरस्वती कला मंडळ केळबाई-कुर्टी यांना प्रथम बक्षीस प्राप्‍त झाले. द्वितीय : सावईवेरे सख्या हरी, तृतीय: यशलीला कल्चरल असोसिएशन प्रियोळ-फोंडा तर उत्तेजनार्थ पारितोषिके श्री गुरुकला मंडळ पिजगाळ व नवदुर्गा कला आणि सांस्कृतिक मंडळ मडकई यांना मिळाले.

वेशभूषेत अनुष्का, दित्‍याला प्रथम क्रमांक

वेशभूषा स्पर्धा ‘अ’ गट: प्रथम: अनुष्का मोरजकर, द्वितीय : शिवा नाईक, तृतीय: योगराज गवंडळकर, चतुर्थ,: योगानंद पालकर, पंचम: रामचंद्र गावणेकर, सहावे: अनिलकुमार पोके, सातवे : मेहबूब तपलवाले, आठवे: रूपेश दिवकर, नववे: विकास गवंडळकर, दहावे: धर्मा नाईक. वेशभूषा स्पर्धा ‘ब’ गट: प्रथम: दित्या शिरवईकर, द्वितीय: रुद्राक्ष नाईक, तृतीय: सुरेखा किनळेकर, उत्तेजनार्थ: प्रज्ञा कुडव, संदेश गडेकर, पलक गडेकर, श्रीनाश सुभाजी, अज्ञा सहकारी व परिधी वायंगणकर.

 Shigmotsav
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देशात स्वराज्य संकल्पना: शिवाजी देसाई

सिनेनृत्‍य स्‍पर्धेत सान्वीची बाजी

सिनेनृत्य स्पर्धा : प्रथम : सान्वी पुजारी, द्वितीय : अनुष्का मोरजकर, तृतीय : सर्वेश गावकर, उत्तेजनार्थ : प्रज्ञा कुडव, श्रेहा सुर्लीकर, विशेष बक्षिसे : तनुश्री वाडीकर, रुद्राक्ष नाईक, लव्या नाईक, जीविका नाईक, दिव्या शिरवईकर, अरुमिका सांगेलकर, शौर्यता आंबेकर व परिधी वायंगणकर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com