Canacona municipal election Dainik Gomantak
गोवा

Canacona municipal election: काणकोण पालिका निवडणूक; इच्छुक उमेदवार लागले कामाला, गुडघ्याला बाशिंग बांधून तयार

Canacona council candidates: काणकोण नगरपालिकेवर प्रशासक म्हणून गणेश गावकर यांची नियुक्ती झाल्यानंतर येत्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

आगोंद: काणकोण नगरपालिकेवर प्रशासक म्हणून गणेश गावकर यांची नियुक्ती झाल्यानंतर येत्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच कंबर कसत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

यंदाच्या निवडणुकीत मंत्री रमेश तवडकर यांच्या गटासह विद्या प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष चेतन देसाई यांच्या पॅनलमध्ये खरी चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले असून विविध भागातील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत आपापले आराखडे आखण्यास सुरुवात केली आहे.

काणकोण नगरपालिकेतील प्रभाग संख्या पूर्वीप्रमाणेच १२ राहणार असून पालिकेतील मतदारसंख्या ९,५८३ इतकी आहे. यंदा सुमारे ६०० मतदारांची घट झालेली दिसून येते. तर नवीन मतदार यादीनुसार काणकोण मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या ३२,८२७ इतकी आहे.

आगामी निवडणुकीत विविध पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून त्यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. ही पालिका निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी मानली जात असल्याने सर्वच पक्षांनी हालचालींना वेग दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

Ranji Trophy: गोव्याची गोलंदाजी पुन्हा निष्प्रभ! बडोद्याचा 472 धावांचा डोंगर; अतीत शेठचे शतक एका धावेने हुकले

SCROLL FOR NEXT