Goa Cyber Crime: 'डिजिटल अरेस्ट'चा सापळा भेदला, मॅजिस्ट्रेटचे खोटे सोंग उघड; साताऱ्यात संशयित जेरबंद

Panaji digital arrest fraud: सीबीआय अधिकारी व मॅजिस्ट्रेट असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पणजीतील एका रहिवाशाची तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर गुन्हे पोलिसांनी पर्दाफाश केला.
Goa Cyber Crime
Goa Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सीबीआय अधिकारी व मॅजिस्ट्रेट असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पणजीतील एका रहिवाशाची तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर गुन्हे पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी सातारा (महाराष्ट्र) येथून अक्षय सुरेश निकम (३०, तारळे, ता. पाटण) याला अटक करण्यात आली असून, त्याच्या बँक खात्यातून ३.१० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.

तक्रारदाराशी २० फेब्रुवारीपूर्वी व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधून संशयितांनी आपण मुंबईतून बोलणारे सीबीआय अधिकारी व मॅजिस्ट्रेट असल्याचे भासवले. तक्रारदाराचे वैयक्तिक तपशील मनी लाँड्रिंग प्रकरणात आल्याची भीती दाखवत त्याला व्हिडिओ कॉलवर सतत देखरेखीखाली ठेवण्यात आले. ‘प्रकरण मिटवण्यासाठी’ ६० लाख रुपये आरटीजीएसद्वारे दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले.

Goa Cyber Crime
Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा वाढला! पारा 34 अंशांवर, घामाच्या धारांनी गोवेकर हैराण

सायबर गुन्हे पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल पोलेकर, हवालदार अनाय नाईक व विनय आमोणकर यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे सातारा येथे छापा टाकून निकम याला ताब्यात घेतले.

तपासात निकमच्या खात्यात ४६ लाख रुपये जमा झाल्याचे व ती रक्कम पुढे इतर साथीदारांच्या खात्यात वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.ही कारवाई सायबर गुन्हे विभागाचे पोलिस अधीक्षक राजू राऊत देसाई व साहाय्यक पोलिस अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, संशयिताला न्यायालयात हजर केले आहे. त्याची पोलीस कोठडीत पुढील चौकशी सुरू आहे.

Goa Cyber Crime
Goa Politics: आपल्याकडून विश्वासघात होणार नाही! काँग्रेस प्रवेशावेळी अमित पालेकरांनी नेत्यांना दिली ग्वाही

फसवणुकीची १२ प्रकरणे!

निकमच्या बँक खात्याच्या विश्लेषणातून मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा येथील आणखी १२ सायबर फसवणूक प्रकरणांशी या खात्याचा संबंध असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणांत मिळून ३.१० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Digital Arrest Fraud Case Goa
9 Arrested From Goa Cyber Crime
goa cyber crime raid fake call centre karmali arrests us citizens loan fraud
Cyber Fraud Case Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com