CM Pramod Swant Dainik Gomantak
गोवा

गोवा विधानसभा सभापतीपदासाठी भाजप आमदार रमेश तवडकरांनी केला अर्ज

मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना सध्या 25 आमदारांचा पाठिंबा आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत विधानसभा सभापतीपदासाठी भाजपतर्फे काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी अर्ज सादर केला. (Canacona BJP MLA Ramesh Tawadkar has filed his nomination for the post of Goa Legislative Assembly)

गोवा विधानसभेच्या (Goa Assembly 2022) अध्यक्षपदासाठी काणकोण भाजपचे आमदार रमेश तवडकर यांनी काळजीवाहु मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना सध्या 25 आमदारांचा पाठिंबा आहे. ज्यात भाजप, एमजीपी आणि 3 अपक्षांचा समावेश आहे. रमेश तवडकर यांच्या बाजूने जादा दोन-तीन मते मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार शपथविधी सोहळा

मुख्यमंत्री सावंत (CM Pramod Sawant) आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा सोमवार, 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था, वाहतूक इत्यादींबाबत पोलिस (Police) आणि प्रशासन काम करत आहे.

शपथविधी समारंभाला 60,000 लोकांची उपस्थिती अपेक्षित

प्रमोद सावंत सरकारच्या शपथविधी समारंभाला 60,000 लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे प्रमुख नेते सोमवारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT